#दात दाखवा केजरीवाल..; केजरीवालांच्या CBI चौकशीनंतर नेटकरी चिंतेत ; 'तो' फोटो व्हायरल..

Dant Dikhao Kejriwal Trend in Social Media : केजरीवाल यांचा एक दात गायब
Dant Dikhao Kejriwal Trend in Social Media
Dant Dikhao Kejriwal Trend in Social Media Sarkarnama

#DaantDikhaoKejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची सीबीआयने काल (रविवारी) साडेनऊ तास चौकशी केली. दिल्ली सरकारने मद्य विक्री धोरणात घेतलेल्या निर्णयात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आधीच दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना अटक करण्यात आली आहे.

साडेनऊ तासांच्या सीबीआय चौकशीनंतर अरविंद केजरीवाल यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "आम आदमी पार्टी ही प्रामाणिक पार्टी आहे. मद्य धोरणातील गैरव्यवहाराचा आरोप चुकीचा आहे. सुडबुध्दींच्या राजकारणातून हा आरोप करण्यात आला आहे," या पत्रकारपरिषदेत केजरीवाल हे व्यवस्थितपणे तोंड उघडू शकत नव्हते. ही बाब नेटकऱ्यांच्या लक्षात आली.

त्यांनी केजरीवाल यांच्या हावभावावर लक्ष केंद्रीत केले. यातील काही नेटकऱ्यांनी केजरीवाल यांचा एक दात गायब असल्याचा शोध लावला. त्यानंतर केजरीवाल यांच्या त्या पत्रकार परिषदेच्या क्लिप आणि केजरीवाल यांचा चौकशी होण्यापूर्वीचा आणि चौकशी झाल्यानंतरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

त्यावर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. सध्या समाज माध्यमांवर #DaantDikhaoKejriwal हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. सीबीआयच्या चौकशीनंतर केजरीवाल यांचा एक दात गायब झाल्याने नेटकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

विनोद यांच्या एका नेटकऱ्याने टि्वटवर दोन फोटो शेअर करीत म्हटलं आहे की पहिला फोटो सकाळचा आणि दुसरा फोटो सांयकाळचा आहे. तुम्हाला आज लक्षात आले नाही की केजरीवाल यांना आज बोलताना त्रास होत आहे. नेहमीप्रमाणे त्यांना बोलता येत नाही, त्यांचा एक दात गायब झाला आहे, असे प्रकाश यांनी म्हटलं आहे. तर सोनी म्हणते, “केजरीवाल दाँत दिखाओ न दाँत।”

Dant Dikhao Kejriwal Trend in Social Media
Ajit Pawar News: अजितदादांच्या मनात नक्की चाललयं काय ?; दौरा रद्द, राजकीय चर्चांना उधाण

अरविंद केजरीवाल यांची रविवारी(१६ एप्रिल) चौकशी झाली, यावर राज्यसभेचे खासदार कपिल सिब्बल यांनी प्रतिक्रिया दिली आहे . त्यांनी टि्वट केलं आहे. "अरविंद केजरीवाल यांचा राजकीय प्रगती उंचावत असताना त्यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (CBI)चौकशीसाठी बोलविले आहे. गेल्या वर्षभरात सरकार केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करीत आहे. यामुळे सर्व राजकीय पक्षांनी मतभेद विसरुन एकत्र येणे गरजेचे आहे. ही लोकशाहीची हत्या असल्याने त्याविरोधात आवाज उठवला पाहिजे," असे सिब्बल यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.

Dant Dikhao Kejriwal Trend in Social Media
Maharashtra Bhushan Award : बारा श्रीसेवकांच्या मृत्युस अमित शाह हेच कारणीभूत ; लवकरच जायचं होतं म्हणून दुपारी..

आम आदमी पक्षाची ओळख ही भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून जन्म घेतलेला पक्ष अशी आहे. पण गेल्या काही काळांमध्ये आमदार ते मंत्री असे अनेक लोक वेगवेगळ्या आरोपांखाली अटक झाले आहेत. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन हे मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली जेलमध्ये आहेत. याआधी सोमनाथ भारती यांच्यावरही घरगुती हिंसाचाराचे आरोप होते. मनीष सिसोदिया हे अटक झालेले आपचे पाचवे मंत्री होते.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com