Lok Sabha Election 2024 : बारामतीत आणखी एका 'तुतारी'ची एन्ट्री; शरद पवारांच्या पक्षाची आयोगाकडे धाव

Baramati Lok Sabha Election 2024 : बारामतीत लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी 50 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या अर्जांची 20 एप्रिलला छाननी झाली.
election commission ncp sharad pawar faction
election commission ncp sharad pawar factionsarkarnama
Published on
Updated on

Pune News : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी (Baramati Lok Sabha Constituency ) सोमवारी (22 एप्रिल) उमेदवारांना निवडणूक चिन्हं बहाल करण्यात आली. या चिन्ह वाटपात सोयल शहा युनूस शहा शेख या अपक्ष उमेदवाराला 'तुतारी' हे चिन्ह देण्यात आले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने नाराजी व्यक्त केली असून, थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता निवडणूक आयोग काय निर्णय घेतो हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी सात मे ला मतदान होणार आहे. बारामतीत लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी 50 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या अर्जांची 20 एप्रिलला छाननी झाली. त्यामध्ये पाच अर्ज बाद करण्यात आले असून, 46 अर्ज वैध ठरवण्यात आले होते. त्यानंतर शेवटच्या दिवशी आठ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने बारामती मतदारसंघातून 38 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. या 38 उमेदवारांना सोमवारी चिन्हांचे वाटप करण्यात आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बारामती मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या शेख यांनी चिन्हांच्या पहिल्या पसंतीक्रमात 'तुतारी' या चिन्हाची मागणी केली होती. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून हे चिन्ह त्यांना देण्यात आले आहे.

मात्र, बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे या 'तुतारी' फुंकणारा माणूस या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे 'तुतारी' हे चिन्ह दुसऱ्या उमेदवारास दिल्यास मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून याबाबत आक्षेप घेण्यात आलेला आहे. त्यामुळे पक्षाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला आक्षेपाचा मेल करण्यात आला आहे.

election commission ncp sharad pawar faction
Ajit Pawar Vs Supriya Sule : अमेरिकेतील पत्रकारावरून ताई, दादा आमने-सामने; 'दादांचे ते वक्तव्य...' सुप्रिया सुळेंची टीका!

दरम्यान, "केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रात वाटप केलेल्या चिन्हांबाबत जिल्हा निवडणूक अधिकार म्हणून मला निर्णय घेता येणार नाही. केंद्रीय निवडणूक आयोगच याबाबतचा निर्णय घेईल," असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी सांगितलं.

( Edited By : Akshay Sabale )

R

election commission ncp sharad pawar faction
Parth Pawar News : बारामती लोकसभेसाठी खडकवासल्याची खिंड पार्थ पवार लढवणार!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com