Pune Police News : पुणे शहरात गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भरदिवसा कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा दे एकदा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी पोलिसांची चांगलीच कान उघडणी केली.उरळी कांचन येथील पोलीस स्टेशनच्या उद्घाटनप्रसंगी अजित पवार बोलत होते.
अजित पवार म्हणाले, शहरात अलीकडे गुन्हेगारीचे प्रकार वाढले आहेत. कोण कुणाला गोळ्या घालतो, पण पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गुन्हेगारांना पकडलं. ससूनमध्ये जे घडलं त्यात कुणाचाच मुलाहिजा बाळगला जाणार नाही, असं गृहमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे कोणी कितीही मोठा असो, कितीही मोठ्या बापाचा असो त्याला सोडणार नाही. कुठे काही कानावर आलं आणि कोणी काही चुकलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सस्पेंड करत नाहीत तर बडतर्फ करतात.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अजित पवार(Ajit Pawar) पुढे म्हणाले गुन्हेगारीचे उदात्तीकरण थांबले पाहिजे. चित्रपटांचा प्रभाव सध्या गुन्हेगारी वरती झालेला दिसतो. पुष्पा नाम हे मेरा, फूल नही फायर हु काय चालंय काय ? वाढदिवस असलेल्या गुन्हेगारांचे बाहेर वाढदिवस साजरे करण्यात येत आहेत. पोलिसांची इभ्रत राहिली पाहिजे त्यासाठी पोलिसींगची पद्धत बदली बदलायला हवी. पोलिसांचे गुन्हेगारी वरती नियंत्रण असले पाहिजे.
पोलिस भरती प्रक्रियात बदल करणे आवश्यक असल्याचंही अजित पवार यांनी सांगितले. पोलिसांनी त्यांच्या तंदुरुस्तीसाठी लक्ष द्यावे. सायबर गुन्हे रोखण्यासाठी अधिकारी-कर्मचारी यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण द्यावे. कोणत्याही परिस्थितीत गुन्हेगारांचे उदात्तीकरण होता कामा नये. गुन्हेगारीवर पोलिसांचा वचक राहिला पाहिजे. पोलिसांच्या मनोबलावर परिणाम होणारे कृत्य होणार नाही याची दक्षता घ्यावी. पोलिसांनी कोणाच्याही दबावाखाली काम न करता गुन्हेगारी मोडून काढावी. सध्या पोलिसांच्या संकल्पनेत बदल झाला आहे. स्मार्ट पोलिसिंगच्या माध्यमातून पोलिस आणि नागरिक यांच्यात चांगले नाते निर्माण होत आहे. असे पवार म्हणाले.
पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, गुन्हेगारी तपासाचा वेग वाढवावा, अभिलेख वर्गीकरण अद्यायावत ठेवावे. वाहतुकीचे योग्य नियमन करावे, कर्मचाऱ्यांना अद्ययावत प्रशिक्षण द्यावे. सर्वच बाजूंनी पोलीस दलाची क्षमता वाढवा. नवीन पोलीस स्टेशनचा प्रश्न मार्गी लावला जाईल. पोलीस विभागाला सर्व सुविधांचा पुरवठा करण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.