Manchar News : घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दिल्या जाणाऱ्या दुधात अळ्या आढळून आल्याची तक्रार देण्यात आली होती. या तक्रारीमुळे खळबळ उडाली होती. मंचर बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम आणि प्रवीण पारधी यांच्यासह काही व्यक्तींनी घोडेगावमधील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात ही तक्रार दिली होती.
आता पराग मिल्क फूड्स लिमिटेड कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष संजय मिश्रा यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आक्रमक इशारा दिला आहे. मिश्रा यांनी मंचर बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम,प्रवीण पारधी यांच्यासह तक्रारदारांविरोधात फौजदारी गुन्हा व 100 कोटी रुपये रक्कमेचा अब्रुनुकसान भरपाईचा दावा दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे.
गोवर्धन ब्रँड-पराग मिल्क फूड्स लि. दुध प्रकल्पाची काही जणांनी जाणीवपूर्वक बदनामी केली आहे. या प्रकरणी आता मुंबई उच्च न्यायालयात (High Court) पराग मिल्क कंपनीच्या व्यवस्थापनाकडून बदनामी करणार्या मंचर बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम, प्रवीण पारधी यांच्यासह सहभागी व्यक्तींनी व खोटी माहिती प्रसारित केल्याचा आरोप केला आहे.
याबाबत मिश्रा म्हणाले, शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना गेल्या सहा वर्षापासून टेट्रापँक या जागतिक तंत्रज्ञानाने विकसित व सुरक्षित असलेल्या दुधाचा पुरवठा केला जातो.राज्य शासनाने निविदाद्वारे महानंदा डेअरी मुंबई,वारणा डेअरी कोल्हापूर,सोनाई इंदापूर,गोवर्धन मंचर-अवसरी खुर्द यांच्याकडून टेट्रापँक दुध खरेदीचा निर्णय घेतला.होणारा दुध पुरवठा अपुरा पडत असल्यामुळे कर्नाटक मिल्क फेडरेशन यांच्याकडूनही टेट्रापँक दुधाचा पुरवठा केला जातो.
आश्रम शाळेत टेट्रापँक दुधाचे बॉक्स सुरक्षित व निर्जंतुक ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे.परंतु, सदर घटनेत टेट्रापँक दुधाचे बॉक्स कुरतडल्याचे संबंधित प्रकल्प अधिकारी यांना आढळून आले आहे. कुठल्याही अधिकाराशिवाय खंडणीच्या उद्देशाने तक्रारदारांनी शासकीय वसतीगृहात प्रवेश केला. स्वतःच एखाद्या शासकीय अधिकाऱ्याप्रमाणे वर्तन करून चौकशी केली.घटनेची माहिती व्हिडीओद्वारे प्रसारित केली.
नियमानुसार सदर माहिती तातडीने अन्न व औषध प्रशासन पुणे (Pune) विभागाला देऊन सदर अधिकारी वर्गाकडून पाहणी किंवा पंचनामा करणे अपेक्षित होते. पण संबधित तक्रारदारांची कृती कटकारस्थानाचा भाग आहे,असे प्रथमदर्शनी वाटते.
प्रकल्प अधिकारी यांनी उघडलेल्या बॉक्समध्ये अळ्या आढळून आल्या नाहीत, पण खंडणीखोराने स्वतः उघडलेल्या बॉक्समध्ये अळ्या आढळून आल्या, मग या आळ्या कशा व कुठून आल्या? या संपूर्ण संशयास्पद प्रकाराची राज्य शासनाने तातडीने दखल घेऊन चौकशी करावी.या चौकशीमधून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील. अशी आम्हाला खात्री आहे, असे मिश्रा यांनी सांगितले.
पराग मिल्क फूड्स कंपनी लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष संजय मिश्रा म्हणाले, टेट्रापँकमध्ये विक्री केल्या जाणाऱ्या दुधात सर्वात सुरक्षित आणि भरपूर पोषक तत्व असतात. उच्च तापमानावर दुध उष्ण केले जाते. त्यानंतर दुधाला थंड करून टेट्रापँकमध्ये भरले जाते.टेट्रापँक हा सहा लेअरचा असतो. त्यामुळे यामध्ये ठेवलेले दुध आरोग्यदायी व सुरक्षित मानले जाते. यासंदर्भात जागतिक स्तरावर टेट्रापँकचे मानांकन आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.