Maharashtra Cabinet portfolio allocation : दादा, शिंदे यांच्या मंत्रालयांवर फडणवीसांचा असाही 'वॉच'?

Mahayuti Government Cabinet portfolio allocation : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपास अखेर मुहूर्त लागला; जाणून घ्या,फडणवीसांचा नेमका कसा असणार वॉच?
Eknath Shinde - Devendra Fadnavis - Ajit Pawar
Eknath Shinde - Devendra Fadnavis - Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Pune Madhuri Misal News : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप आज(शनिवार) जाहीर करण्यात आले आहे. या मंत्रिमंडळ विस्तारावर भाजपची छाप मोठ्या प्रमाणात असल्याची पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रालय स्वतःकडे ठेवण्यात यश मिळवलं आहे.

तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्याकडे नगर विकास आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे मात्र या नेत्यांवर दोन्ही खात्यांची जबाबदारी सोपवताना देवेंद्र फडणवीस यांनी याच खात्यांमध्ये राज्यमंत्री म्हणून आपल्या खास आमदारांना संधी दिली असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या मंत्रालयांवर मुख्यमंत्री फडणवीसांच्या असाही वॉच राहणार का? याबाबत चर्चा रंगल्या आहेत.

राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड असे यश मिळाले. त्यानंतर आठवड्याहून अधिक कालावधी मध्ये झालेल्या वाटाघाटी नंतर 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे, अजित पवार(Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार 10 ते 12 दिवस रखडला होता. अखेर 15 डिसेंबर रोजी 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यानंतर आता खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.

Eknath Shinde - Devendra Fadnavis - Ajit Pawar
Cabinet Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, गृह फडणवीसांकडेच, अजितदादांना अर्थ तर एकनाथ शिंदेंकडे...मंत्र्यांना कोणती खाती? संपूर्ण यादी!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी गृह, ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती व प्रसारण व खातेवाटप न झालेल सर्वच खाती आपल्याकडे ठेवली आहेत. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क या विभागांचा पदभार असणार आहे.

Eknath Shinde - Devendra Fadnavis - Ajit Pawar
Maharashtra Cabinet portfolio distribution: राज्य मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाला मुहूर्त लागला; देवेंद्र फडणवीसांनी गृह सोडलेच नाही; शिंदेंकडे....

या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आलेल्या नगर विकास खात्याच्या राज्यमंत्रीपदी पुण्यातील आमदार माधुरी मिसाळ यांची वर्णी लावण्यात आली आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असणाऱ्या अर्थ व नियोजन खात्याच्या राज्यमंत्री पदाची जबाबदार शिंदेंच्या शिवसेनेत असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेल्या नागपूर येथील आमदार आशिष जयस्वाल यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे एक प्रकारे शिंदे आणि अजित पवारांच्या मंत्रालयावर फडणवीस यांच्या विश्वासू आमदारांचाही वॉच राहणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com