Devendra Fadnavis: "राजकारणात खरं माहिती असलं तरी बोलायचं नसतं कारण..."; गडकरींच्या स्पष्टवक्तेपणावर भाष्य करताना फडणवीसांचं मोठ विधान

Nitin Gadkari Awarded by Lokmanya Tilak Purskar : नितीन गडकरी यांना प्रतिष्ठेच्या लोकमान्य टिळक पुरस्कारानं पुण्यात गौरवण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis
Published on
Updated on

Nitin Gadkari Awarded by Lokmanya Tilak Purskar : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक पुरस्कारानं पुण्यात गौरवण्यात आलं. लोकमान्या टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त देण्यात येणारा हा पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गडकरींना प्रदान करण्यात आला.

यावेळी फडणवीसांनी गडकरींचं तोंडभरून कौतुक केलं. यावेळी व्यासपीठावर मंत्री चंद्रकांत पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, रोहित टिळक, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आदी उपस्थित होते. गडकरींच्या स्पष्टवक्तेपणावर भाष्य करताना राजकारणात खरं माहिती असलं तरी बोलायचं नसतं असं विधानही त्यांनी केलं.

Devendra Fadnavis
Yavat Violence: यवतच्या हिंसाचाऱ्याच्या घटनेवर गोपिचंद पडळकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, दोन-तीन महिन्यांपासून...

फडणवीस नेमकं काय म्हणाले?

नितीन गडकरी यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात, आरोग्याच्या क्षेत्रात चांगलं काम केलेलं आहे. अनेक आरोग्याचे प्रकल्प नितीन गडकरी चालवतात. कुठल्याही गरजू गरिबाला ऑपरेशन करायचं असेल तर ते करुन देतात. हजारो लोकांच्या जीवनात त्यांनी परिवर्तन घडवलं. या कामाची त्यांनी कधीही जाहिरातही त्यांनी केली नाही. कधी याबाबत कुठला पुरस्कारही त्यांनी मिळवण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही. अतिशय संवेदनशील मानचे नितीन गडकरी आहेत.

सत्य माहिती असूनही बोलू नये

तसंच जे मनात येईल ते बोलणारे देखील नितीन गडकरी आहेत. त्यांनी कधीही याची चिंता केली नाही की याचा परिणाम काय होईल? राजकारणात अनेक वेळा सत्य माहिती असून देखील ते बोलू नये असं आपण ठरवतो. कारण दरवेळी सत्य बोलल्यानं त्या ठिकाणी फायदाच होतो असं नाही, राजकारणात बऱ्याचदा त्यामुळं नुकसान होतं. पण अशी परिस्थिती आलं तर नितीन गडकरी हमखास बोलतात, त्याचं कितीही नुकसान झालं तरी ते चिंता करत नाहीत. पण त्यामुळं त्यांची प्रतिमा देखील अशी झाली आहे की, ते सोईचं बोलणार नाहीत. पोलिटिकली करेक्ट बोलणार नाहीत तर त्यांच्या जे मनात आहे तेच ते बोलतील. त्यांचं स्पष्टवक्तेपणा आणि बोलणं लोकांना आवडतं.

Devendra Fadnavis
Ajit Pawar : गडकरी, फडणवीसांसमोरच अजितदादांनी चंद्रकांत पाटलांना डिवचलं; दोन दादांवरून निघालेला विषय पोहचला पालकमंत्रिपदापर्यंत...

अजितदादा, गडकरींमध्ये साम्य

अजितदादा आणि नितीन गडकरींमध्ये देखील एक साम्य आहे. कुठेही एकादं नवीन बांधकाम झालं की तिथे हे दोघे जाऊन त्यात काय चुकलं हे शोधून काढतात. यात थोडीशी जरी चूक मिळाली तरी सर्वांसमोर त्याची खरडपट्टी काढून पुढच्यावेळेस तो अशी चूक करणार नाही याची पूर्ण खात्री ते बाळगतात. त्यामुळं क्वालिटी हा नितीन गडकरी यांचा गुण आहे, अशा शब्दांत फडणवीसांनी गडकरींचं तोंडभरून कौतुक केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com