BJP District President Appointment : शहराध्यक्ष निवडीवरून भाजपमध्ये दुफळी; शंकर जगतापांच्या निवडीला विरोध

PCMC Politics : चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रातील सत्तर जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या अखेर बुधवारी (ता.१९) सकाळी जाहीर केल्या.
Shankar Jagtap
Shankar JagtapSarkarnama
Published on
Updated on

BJP District President Appointment : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रातील सत्तर जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या अखेर बुधवारी (ता.१९) सकाळी जाहीर केल्या. त्यात पिंपरी-चिंचवडच्या अध्यक्षपदी पक्षाचे माजी शहराध्यक्ष आणि चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू आणि चिंचवडच्या भाजपच्या आमदार अश्विनी जगताप यांचे दीर शंकर जगताप यांची नेमणूक करण्यात आली. पण, या नियुक्तीला लगेचच पक्षातूनच तीव्र विरोध समोर आला असून भाजपमध्येही परिवारवाद रुजल्याची टीका त्यावर सुरु झाली आहे.

Shankar Jagtap
Monsoon Session 2023 : सोमय्यांना भाजप पाठिशी का घालत आहे? विधीमंडळाच्या पायऱ्यांवरून विरोधकांचा सरकारला सवाल

आ.लक्ष्मण जगताप यांचे यावर्षी ३ जानेवारीला दीर्घ आजाराने निधन झाले.त्यानंतर १५ दिवसांतच तेथे पोटनिवडणूक लागली. त्यावेळी उमेदवार म्हणून शंकर जगताप यांचे नाव पुढे येताच त्याला पहिला विरोध पक्षातूनच आणि चिंचवड विधानसभेतील भाजपच्या काही माजी नगरसेवकांनीच केला होता. त्यामुळे आ.जगतापांच्या पत्नी अश्विनी यांची उमेदवारी नंतर जाहीर केली गेली.

अध्यक्षपदी शंकर जगताप यांची निवड होताच सहा महिन्यात त्यांच्या नावाला दुसऱ्यांदा विरोध झाल्याचे समोर आले आहे. या पदासाठी तीव्र इच्छूक असलेले पक्षाचे पिंपरी-चिंचवड संघटन सरचिटणीस आणि जुने एकनिष्ठ भाजपाई अमोल थोरात यांनी हा घरचा आहेर पक्षाला दिला आहे. त्यांनी आपली नाराजी पक्षश्रेष्ठींना कळविली आहे. शंकर जगतापांची निवड म्हणजे जगताप कुटुंबाला झुकतं माप असून यातून 'परिवारवाद' दिसून येतो, अशी तोफ त्यांनी डागली आहे. त्यातून शहर भाजपमध्ये दुफळी निर्माण झाली आहे.

Shankar Jagtap
Somaiya Viral Video Case: : सोमय्यांमुळे त्रास झाला, तरीही बाबा, त्यांच्या हक्कासांठी तुम्ही उभे राहिलात ; नताशाचं Tweet व्हायरल..

थोरात यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लक्ष्मण जगतापांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपने पोटनिवडणुकीत संधी दिली.त्यावेळी पक्ष आणि शहरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्यासोबत राहिल्याने त्या आमदार झाल्या. असे असतानाच जगताप कुटुंबातील शंकर जगताप यांना भाजपने प्रदेश पातळीवर (निमंत्रित सदस्य)संधी दिली. संघटनेत त्यांना अवघे वर्ष झाले नसताना आता शहराध्यक्षपदी त्यांची निवड केली. त्यामुळे पक्षाच्या धोरणांबाबत चर्चा सुरू झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय पक्षांमधील कुटुंबवादाला नेहमीच विरोध केला आहे. पार्टी विथ डिफरन्स असे म्हणत भाजपनेदेखील एकाच कुटुंबात अनेक पदे किंवा एकाच कुटुंबातील व्यक्तींना वारंवार संधी देण्याचे टाळले आहे. असे असतानाच जगताप कुटुंबातील व्यक्तींना सतत झुकते माप दिले जाते आहे. लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी केलेले तंत्र म्हणजे लोकतंत्र (लोकशाही), या तत्वानुसार भाजप संघटना काम करत आहे, असे मोदी सातत्याने सांगत असतात. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून पिंपरी चिंचवड अध्यक्षपदी शंकर जगताप यांची निवड झाली.

Shankar Jagtap
Jalgaon BJP News : जळगाव जिल्ह्यात भाजपचे तब्बल तीन अध्यक्ष; शहरात पहिल्यांदाच महिलेला संधी!

एकाच कुटुंबाकडे विविध पदे दिली जात आहेत. यातून भाजपच्या धोरण आणि तत्वांना तिलांजली दिली जाते आहे. शहरातील जुन्या व एकनिष्ठ असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना हा निर्णय न पटण्यासारखा आहे. शहरात पक्षाचे अस्तित्व टिकवून पक्षवाढीसाठी सतत झटणाऱ्यांची त्यामुळे घुसमट होत आहे,अशी नाराजी थोरात यांनी व्यक्त केली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com