PMRDA Projects : पुण्यातील 15 नगररचना योजना रद्द होणार? CM फडणवीसांच्या बैठकीत PMRDA ला प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश

Devendra Fadnavis on Pune Mega Projects : पुण्यातील दैनंदिन वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी उच्चक्षमता सामूहिक वाहतूक मार्ग (एचसीएमटीआर), PMRDA चा अंतर्गत रिंग रोड आणि 'पाताळलोक' बोगद्यांचे जाळे हे तीन प्रकल्प प्राधान्याने राबवले जाणार आहेत.
Devendra Fadnavis PMRDA
Devendra Fadnavis PMRDA sarkarnama
Published on
Updated on

Pune News, 28 Jul : पुणे व परिसरातील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील तीन महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्याचे स्पष्ट निर्देश दिले. तसेच प्रस्तावित 15 नगररचना योजनेबाबत महत्वाचा निर्माण घेण्यात आला. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पुण्याच्या वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणारे तीन महाप्रकल्प

पुण्यातील दैनंदिन वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी उच्चक्षमता सामूहिक वाहतूक मार्ग (एचसीएमटीआर), PMRDA चा अंतर्गत रिंग रोड आणि 'पाताळलोक' बोगद्यांचे जाळे हे तीन प्रकल्प प्राधान्याने राबवले जाणार आहेत. या प्रकल्पांसाठी लागणारी शासकीय जमीन पुणे महापालिका व PMRDA कडे वर्ग करण्यासाठी एकीकृत शासन निर्णय काढण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

२-३ वर्षांत एचसीएमटीआर प्रकल्प मार्गी लावण्याचा संकल्प

शहरातील मध्यवर्ती भागातून जाणारा ४३.६० किमी लांबीचा एचसीएमटीआर उन्नत मार्ग पुण्याच्या वाहतुकीचा कणा ठरणार आहे. या प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक २५ ते ३० टक्क्यांनी कमी होईल, असा अंदाज आहे. सर्व मेट्रो मार्गिकांना जोडणारा हा मार्ग २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, यासाठी तातडीने आर्थिक मॉडेल तयार करून प्रशासकीय मान्यता मिळवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रकल्पाच्या बांधकामासाठी सुमारे ९ हजार कोटी आणि भूसंपादनासाठी ३ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प चार वेगवेगळ्या पॅकेजेसमध्ये विभागून पूर्ण केला जाईल.

Devendra Fadnavis PMRDA
Pune Wall Painting in Rain : पुण्यात भाजप नगरसेविकेकडून महापालिकेला 'चुना'? भर पावसात भिंतींना रंगरंगोटी; रंग अन् लाखो रुपये वाहून पाण्यात

PMRDA रिंग रोडसाठी रोख मोबदल्याद्वारे भूसंपादन

८३.१२ किमी लांबीचा आणि ४४ गावांना जोडणारा PMRDA चा अंतर्गत रिंग रोड प्रकल्प एकूण पाच टप्प्यांत साकारला जाणार आहे. या २५,१५९.८८ कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी लागणाऱ्या खासगी जमिनीचे भूसंपादन रोख मोबदल्याच्या माध्यमातून पुढील ६ ते ७ महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या मुळे सोळू, वडगाव शिंदे, वाघोली ते पार परंदवाडीपर्यंतचा पट्टा जोडला जाऊन बाहेरील वाहतूक शहराबाहेरच वळवणे शक्य होईल.

'पाताळलोक' प्रकल्पांतर्गत भुयारी मार्गांचे जाळे

शहरांतर्गत वेगाने प्रवासासाठी भूमिगत बोगद्यांचा पर्याय निवडण्यात आला आहे. भोसरी ते उंदरी-नवीन विमानतळ (३६ किमी), रामनदी-भूगाव ते राजाराम पूल (८ किमी) आणि तळजाई टेकडी ते पद्मावती-हिंगणे (१.६५ किमी) या तीन प्रमुख मार्गांवर बोगदे प्रस्तावित आहेत. या संपूर्ण 'पाताळलोक' प्रकल्पाचा सर्वंकष अभ्यास व पाहणी करण्यासाठी तज्ज्ञ संस्थांची मदत घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Devendra Fadnavis PMRDA
Karad Student Death : NEET तणावाचा आणखी एक बळी; कराडमधील विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल

नगररचना योजनांबाबत मोठा निर्णय

तसेच, PMRDA च्या प्रस्तावित नगररचना योजनांसंदर्भातही बैठकीत चर्चा करण्यात आली. PMRDA आणि पुणे महानगरपालिकेच्या 15 नगररचना योजना प्रस्तावित असून, त्या रद्द करण्यासंदर्भात PMRDA ने आपल्या स्तरावर प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करावा, असे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com