Karad Student Death : NEET तणावाचा आणखी एक बळी; कराडमधील विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल

NEET Result Stress : सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात आणखी एका विद्यार्थिनीने नीट परीक्षेत अपेक्षित यश न मिळाल्याने नैराश्यात विषारी औषध प्राशन केले. नीट (NEET) परीक्षेत अपयश आल्याने कराड तालुक्यातील शेरे येथील समीक्षा दीपक पवार या विद्यार्थीनीने आपलं आयुष्य संपवलं आहे.
NEET Result Stress | Karad Student Death
NEET Result Stress | Karad Student DeathSarkarnama
Published on
Updated on

Karad Student Death : गेल्या काही दिवसांत नीट परीक्षेतील अपयश आणि पेपरफुटी प्रकरणानंतर निर्माण झालेल्या मानसिक तणावाच्या पार्श्वभूमीवर काही विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

अशातच सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात आणखी एका विद्यार्थिनीने नीट परीक्षेत अपेक्षित यश न मिळाल्याने नैराश्यात विषारी औषध प्राशन केले. नीट (NEET) परीक्षेत अपयश आल्याने कराड तालुक्यातील शेरे येथील समीक्षा दीपक पवार या विद्यार्थीनीने आपलं आयुष्य संपवलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीक्षाने मागील वर्षी नीट परीक्षा दिली होती. मात्र, निकाल अपेक्षेप्रमाणे न लागल्यामुळे ती काही काळापासून मानसिक तणावाखाली होती. या नैराश्याच्या अवस्थेत तिने २३ जुलै रोजी उंदीर मारण्यासाठी वापरले जाणारे विषारी औषध प्राशन केले. सुरुवातीला तिने ही बाब कुटुंबीयांपासून लपवून ठेवली होती.

NEET Result Stress | Karad Student Death
Maharashtra News Live Update : महिलेकडून 10.46 लाख उकळले; जबरदस्तीने शरिरसंबंध ठेवण्यास दोघांनी भाग पाडले, पोलिसांत तक्रार दाखल

मात्र, घटनेनंतर दोन दिवसांनी तिची प्रकृती अचानक बिघडू लागली आणि तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर तिने विषारी औषध घेतल्याची माहिती कुटुंबीयांना दिली. नातेवाईकांनी तातडीने तिला कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी उपचार सुरू केले, मात्र उपचार सुरू असतानाच तिची प्राणज्योत मालवली.

NEET Result Stress | Karad Student Death
Pune Wall Painting in Rain : पुण्यात भाजप नगरसेविकेकडून महापालिकेला 'चुना'? भर पावसात भिंतींना रंगरंगोटी; रंग अन् लाखो रुपये वाहून पाण्यात

या घटनेमुळे शेरे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, स्पर्धा परीक्षांमधील अपयशामुळे विद्यार्थ्यांवर वाढणाऱ्या मानसिक तणावाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार सुनील पन्हाळे करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com