
✅ 3-पॉइंट सारांश (Summary):
फडणवीसांच्या ताफ्यामुळे अफवा पसरली: पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्याने अचानक मार्ग बदलल्याने आयुक्तांच्या निवासस्थानी भेट देणार अशी अफवा पसरली.
राजकीय वातावरण तापले: प्रभाग रचना हस्तक्षेपाची भीती वाटून विरोधी पक्षांनी कार्यकर्ते आयुक्तांच्या घरासमोर पाठवले, पण नंतर ती अफवा असल्याचे स्पष्ट झाले.
प्रभाग रचनेत बदल: पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार असून, 2025 मध्ये 32 नवीन गावांसह चार सदस्यीय प्रभाग कायम राहणार आहे.
Pune News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल पुणे दौऱ्यावर होते. त्यांनी शहरातील अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली. पण, या कार्यक्रमांपेक्षा एका अफवेमुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. या अफवेमुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला.
यशदा येथील पुणे महानगर ग्रोथ हबची बैठक आटोपल्यानंतर काल फडणवीसांचा ताफा कोथरूडच्या दिशेने निघणार होता, असे नियोजित होते. मात्र, गणेशखिंड रस्त्यावरून जाताना त्यांच्या ताफ्याने अचानक मार्ग बदलला आणि मॉडेल कॉलनीकडे वळला. या मार्गावर पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांचे निवासस्थान आहे. ही बातमी पसरताच राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.
यामागचे कारण होते गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सुरू असलेली महापालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेबाबतची चर्चा. फडणवीसांचा ताफा आयुक्तांच्या बंगल्याकडे निघाला असल्याची अफवा पसरली आणि कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. काहींना वाटले की, फडणवीस प्रभाग रचनेच्या कामात हस्तक्षेप करणार आहेत.
विरोधी पक्षांनी तर आपल्या कार्यकर्त्यांना आयुक्तांच्या निवासस्थानाजवळ पाठवले. पण, काही वेळातच खरे चित्र समोर आले. प्रत्यक्षात फडणवीस मॉडेल कॉलनीतील लकाकी तलावाजवळील एका बड्या उद्योगपतीच्या घरी भेटीसाठी गेले होते. तिथे काही वेळ थांबून ते कोथरूडला रवाना झाले. या खुलाशाने विरोधकांना निराशा झाली, तर आयुक्तांच्या निवासस्थानाजवळ पोहोचलेल्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.
पुणे महापालिकेच्या प्रारुप आराखडा सोमवारी राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे. महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी बाबतचा आढावा नुकताच घेतला आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी 2017 प्रमाणेच 2025 मध्येही चार सदस्यांचा प्रभाग असेल. तर महापालिकेत 32 गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांनाही प्रभाग रचनेत सहभागी करावे लागणार आहे. त्यामुळे उपनगरातील प्रभाग रचनेत मोठे फेरबदल होणार आहे.
✅ 4 FAQs with One-Line Answers:
Q1. अफवेमुळे पुण्यात राजकीय गोंधळ का निर्माण झाला?
फडणवीस आयुक्तांच्या निवासस्थानी जात आहेत अशी अफवा पसरल्यामुळे गोंधळ उडाला.
Q2. फडणवीस प्रत्यक्षात कुठे गेले होते?
ते मॉडेल कॉलनीतील एका उद्योगपतीच्या घरी भेटीसाठी गेले होते.
Q3. पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेत काय बदल होणार आहेत?
चार सदस्यीय प्रभाग राखून 32 नवीन गावांचा समावेश केला जाणार आहे.
Q4. प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा कधी सादर होणार आहे?
हा प्रारूप आराखडा राज्य सरकारला सोमवारी सादर केला जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.