BJP State Executive Meeting News : भाजपच्या ढुढ्ढाचार्यांना फडणवीसांचे राष्ट्रीय अध्यक्षांसमोरच टोले; कार्यकारिणीत काय घडले?

BJP State Executive Meeting Pune News : भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यात पार पडली
Devendra Fadnavis News
Devendra Fadnavis NewsSarkarnama

Devendra Fadnavis News : अनेक नवे कार्यकर्ते समर्पणाने पक्षासाठी काम करताना पाहायला मिळतात. त्यांचा पक्षाशी फारसा संबंध आला नसेल तेही चांगले काम करत आहेत. कधीकधी एखादा जुना कार्यकर्ता पद मिळाले नाही एखादी मनासारखी गोष्ट झाली नाही म्हणून ज्यावेळी आक्रोश करताना दिसतो, त्यावेळी राजकारणात का आलो असा प्रश्न पडतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले.

भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यात पार पडली. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस बोलत होते. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्ड यांच्यासमोर फडणवीस यांनी भाजप मधील ढुढ्ढाचार्यांना चांगलेच खडेबोल सुनावले. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane), रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे (Pankaja Munde), मंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेकर बावनकुळे (Chandrashekar Bawankule), विनोद तावडे उपस्थित होते.

Devendra Fadnavis News
BJP State Executive Meeting: निवडणुकांच्या तोंडावर भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांची होणार चांदी; पावणेदोन लाख विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होणार

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, अनेक नवे कार्यकर्ते समर्पणाने काम करतात. त्यांचा पक्षाशी फारसा संबंधही आलेला नसतो. तेही चांगले काम करत आहेत. कधीकधी एखादा जुना कार्यकर्ता पद मिळाले नाही म्हणून आक्रोश करताना दिसतो, त्यावेळी आपण राजकारणात का आलो असा प्रश्न मला पडतो. पुढच्या काळात तुमच्या कामाचे मूल्यमापन होईल, असा इशाराच फडणवीसांनी (Devendra Fadnavis) दिला. तसेच वर्षभरानंतर त्यांनी त्याग केला आहे त्यांच्याच त्यागाचे मूल्यमापन होईल. ज्यांनी त्याग केला नाही त्यांचा फार उपयोग देखील राहणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.

तसेच पुढच्या एक वर्षात कोणाला काही मिळणार नाही. कुणी समिती मागायची नाही, का पद मागायचे नाही. मंत्रीपद मागायचे नाही. आता ही वेळ आहे की पक्षाने मला काय दिले विचारण्यापेक्षा मी पक्षाला काय देणार? ज्याच्यामध्ये हिम्मत आहे मी मागणार नाही देणार. त्याच्यामध्ये दानत आहे मी मागणार नाही देणार तो खरा भाजपचा कार्यकर्ता आहे, असे फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना सुनावले.

Devendra Fadnavis News
BJP News: मुंबई महापालिका निवडणुकीची भाजपची रणनीती ठरली?; जे.पी.नड्डांनी पदाधिकाऱ्यांना दिला 'हा' कानमंत्र

व्यासपीठावरील दिग्गजांकडे पाहत फडणवीस म्हणाले, तुम्ही मला सांगाल तो त्याग करायला मी तयार आहे. तुम्ही जर मला सांगितले पद सोड, मी पद सोडायला तयार आहे. तुम्ही मला सांगितले घर सोड, तर मी एक वर्ष घर सोडायलाही तयार आहे. तुमची त्याग करायची तयारी आहे का ते सांगा. मी म्हणतो म्हणून नाही तर खरच सांगा, त्याग करण्याची तयारी आहे का? ज्याच्यामध्ये दानत आहे मी मागणार नाही देणार तो खरा भाजपचा कार्यकर्ता, आहे असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com