BJP State Executive Meeting In Pune : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. येत्या पंधरा दिवसांमध्ये राज्य सरकार पावणेदोन लाख विशेष कार्यकारी अधिकारी नेमणार आहे. त्या माध्यमातून भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना पदे मिळणार आहेत. अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली आहे.
भाजपची (BJP) प्रदेश कार्यकारणी ची बैठक आज (ता. 18) पुण्यात बालगंधर्व सभागृहात सुरू आहे. यावेळी बोलताना बावनकुळे यांनी ही घोषणा केली. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर पावणेदोन लाख विशेष कार्यकारी अधिकारी नेमण्यात येणार आहेत. या पदांवर भारतीय जनता पक्षाचे सव्वा लाख कार्यकर्ते आणि शिवसेनेच्या (shivsena) पन्नास हजार कार्यकर्त्यांना संधी देण्यात येणार आहे. भारतीय जनता पक्षाचे बूथ लेव्हलचे अध्यक्ष आणि मंडलाध्यक्षांना विशेष कार्यकारी अधिकारी करण्यात येणार, असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
तर शिवसेनेच्या संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांना ही संधी देण्यात येणार आहे. या माध्यमातून राज्य सरकार निवडणुकीची तयारी करीत असून कार्यकर्त्यांना या पदांवर संधी देण्यासाठी तातडीची योजना जाहीर करण्यात आली आहे. पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या पातळीवरच या नेमणुका होणार आहेत.
त्यासाठी राज्य सरकारच्या परवानगीची गरज लागणार नाही. त्यामुळे केवळ पंधरा दिवसात या नेमणुका होणार आहेत. त्या माध्यमातून दोन्ही पक्षाच्या सुमारे पावणे दोन लाख कार्यकर्त्यांना थेट विशेष कार्यकारी अधिकारी करण्यात येणार आहे. या माध्यमातून भाजपने आणि शिवसेने निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.