Devendra Fadnavis News : ललित पाटीलच्या अटकेनंतर फडणवीसांचा खळबळजनक दावा; "...त्यामुळे अनेकांची तोंडं बंद होणार!"

Drug Mafia Lalit Patil Arrest : " ललित पाटीलच्या अटकेनंतर काही गोष्टी समोर आल्या आहेत, मात्र,..."
Devendra Fadnavis - Lalit Patil
Devendra Fadnavis - Lalit Patil Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : ससून रुग्णालयातून ड्रगमाफिया ललित पाटील पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला होता. तेव्हापासून पोलिस त्यांच्या मागावर होते. अखेर मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी ललित पाटीलला चेन्नईतून अटक केली आहे. तो श्रीलंकेला पळून जाण्याच्या तयारीत होता. मागील सोळा दिवसांपासून पोलिस त्याचा कसून शोध घेत होते, पण आता ललित पाटीलच्या अटकेनंतर उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खळबळजनक विधान केला आहे.

उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीसांनी बुधवारी मीडियाशी संवाद साधला. त्यांनी ललित पाटील याच्या अटकेवर सूचक वक्तव्य केले. ललित पाटीलच्या अटकेमुळे ड्रग्जबाबतचं मोठं रॅकेट उघड होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच आता अनेक गोष्टी बाहेर येणार असून, त्यामुळे अनेकांची तोंडं बंद होणार असल्याचेही ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Devendra Fadnavis - Lalit Patil
Devendra Fadnavis News : शिंदे गटाच्या २२ जागांवरील दाव्यानंतर फडणवीसांचं मोठं विधान; " ज्याला जेवढ्या जागा..."

फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र ड्रग्जमुक्त करणं हे सरकारचे ध्येय असून, त्यासाठी जोरदार उपाययोजना केल्या जात आहेत. ललित पाटीलच्या अटकेनंतर काही गोष्टी समोर आल्या आहेत, मात्र, त्या आताच जाहीर करणार नसल्याचं फडणवीस यांनी सांगितले.

पुणे पोलिसांनी आत्तापर्यंत ड्रग्स रॅकेटप्रकरणी आत्तापर्यंत १४ जणांना अटक केली. त्यानंतर मंगळवारी याप्रकरणी १५ व्या आरोपीला आणि ड्रग रॅकेट प्रकरणातील मास्टरमाइंड ललित पाटीलला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याला न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली असून, त्याच्या चौकशीत बरीच माहिती समोर येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

ड्रगमाफिया ललित पाटील पोलिसांना गुंगारा देऊन ससून रुग्णालयातून पळून गेला होता. त्यानंतर त्याला चेन्नईतून मुंबई पोलिसांच्या पथकाने अटक केली. ससूनमधून पळाल्यानंतर तो १५ दिवस फरार होता. अनेकदा पोलिसांना त्याने गुंगाराही दिला. ज्या-ज्या ठिकाणी पोलिस जायचे तेथून तो पळून गेलेला असायचा.(Drug Racket)

ससूनमधून बाहेर पडल्यानंतर ललित पाटील सर्वात आधी नाशिकला, चाळीसगावला गेला. त्यानंतर तो धुळे, संभाजीनगरमध्ये लपून बसला. तिथून पुढे तो गुजरातला गेल्याची माहिती समोर आली. जवळपास तीन दिवस तो गुजरातमध्ये होता.

Devendra Fadnavis - Lalit Patil
Dadarao Keche News : फडणवीसांचे 'खास' अन् भाजप आमदारामध्ये जुंपली!; MIDCच्या श्रेयवादातून दादाराव केचे संतापले

अखेर पोलिसांनी त्याला मुंबई पोलिसांची पाच आणि पुणे पोलिसांची १० अशी १५ पथके तयार केली. ही १५ पथकेही गेल्या काही दिवसांपासून त्याच्या मागावर होती. तो श्रीलंकेत पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला चेन्नईतून अटक केली.

(Edited By Deepak Kulkarni)

Devendra Fadnavis - Lalit Patil
OBC Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच राज्य सरकारने 'ओबीसीं'ना दिले लेखी आश्वासन; कुणबी...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com