Devendra Fadnavis On Pankaja Munde : 'पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी दिली जावी यासाठी आमचा आग्रह होता' ; फडणवीसांचं विधान!

BJP Legislative Council candidature : भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचेही आभार मानले आहेत अन् राहुल गांधींनी हिंदूंबाबात केलेल्या वक्तव्याचा निषेधही नोंदवला
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama

Devendra Fadnavis and BJP Politics : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने उमेदवार जाहीर केले आहेत. उमेदवारांमध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतर पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन होणार याबाबतच्या चर्चा सुरू असतानाच ही उमेदवारी जाहीर केल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये आनंद आहे.

मागील काही काळापासून पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांना जाणीवपूर्वक डावलण्यात येत असल्याचा त्यांच्या समर्थकांचा आरोप होता आणि चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. राज्यात भाजपचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस करत असल्याने याला कुठेतरी त्यांना मुंडे यांच्या समर्थकांकडून जबाबदार मानलं जात होतं. मात्र आता त्याच फडणवीसांनी पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळावी यासाठी आम्ही केंद्रातील भाजप वरिष्ठांकडे आग्रह धरला होता, असं सांगितलं आहे.

Devendra Fadnavis
Bjp News : मोठी बातमी : भाजपकडून विधानपरिषदेसाठी पंकजा मुंडे, अमित गोरखे, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर, फुकेंना उमेदवारी

देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) पुणे दौऱ्यावरती असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला देवेंद्र फडणवीस म्हणाले, विधान परिषदेसाठी भाजपकडून पाच नावं जाहीर करण्यात आली आहेत. विशेषतः आमचा सर्वांचा आग्रह होता की पंकजा मुंडे यांना विधान परिषदेमध्ये संधी देण्यात यावी. भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाने ते मान्य केलं आणि त्यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. याबद्दल आम्ही भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाचे आभार मानत असल्याचंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis
Hadapsar Assembly Constituency : टिळेकरांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर; तुपे अन् भानगिरेंचा मार्ग मोकळा, भाजप हडपसरवरील दावा सोडणार?

राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्याचा केला निषेध -

तर राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी हिंदूंबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'राहुल गांधींनी केलेलं विधान हे अत्यंत आक्षेपार्ह आहे. त्यांनी हिंदूंना हिसंक म्हणून हिंदूंचा अपमान केला. त्यांनी त्यांचे विधान मागे घ्यावे. आम्ही त्याचा निषेध करतो. त्यांनी संसदेत हिंदूंची माफी मागितली पाहिजे.'

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com