BJP Politics : भाजप पुणे शहराचा कारभारी बदलणार! शहराध्यक्षपदी ब्राह्मण, मराठा की ओबीसी चेहरा? कोल्हापूरकर घेणार निर्णय

Dhananjay Mahadik Appointed BJP Observer : पुण्यातील भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्याकडे कोल्हापूर शहर, हातकणंगले आणि करवीरची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
 yogesh tilekar dhiraj ghate hemant rasane
yogesh tilekar dhiraj ghate hemant rasanesarkarnama
Published on
Updated on

Pune News : भारतीय जनता पक्षाकडून राज्यातील शहर आणि जिल्हाध्यक्ष बदलाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या दृष्टिकोनातून राज्यातील 24 जिल्ह्यांसाठी निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. या निरीक्षकांची शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष निवडीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. कोल्हापूरच्या खासदारांना पुणे शहर आणि जिल्हाच्या निरीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर पुण्यातील आमदाराला कोल्हापूरचा निरीक्षक करण्यात आले आहे.

सध्या भाजपमध्ये केंद्रापासून राज्यापर्यंत संघटनात्मक बदलाचे वारे वाहताना पाहायला मिळत आहेत. भाजपकडून लवकरच राष्ट्रीय अध्यक्ष निवडले जाणार आहेत. तसेच प्रदेशाध्यक्ष देखील निवड होणार आहे. मात्र त्यापूर्वी मंडल अध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

 yogesh tilekar dhiraj ghate hemant rasane
Maharashtra Hindi controvercy : हिंदी भाषेच्या सक्तीचं समर्थन करत शिंदेंच्या नेत्याचा मनसेवर हल्लाबोल, म्हणाले, "मनसे नेत्यांची मुलं..."

पुणे शहर, मावळ, बारामती आणि पिंपरी-चिंचवडची जबाबदार भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे देण्यात आली आहे. तर पुण्यातील भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्याकडे कोल्हापूर शहर, हातकणंगले आणि करवीरची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राजेश पांडे हे देखील सोलापूरची निरीक्षकपदाची जबाबदारी पार पाडणार आहेत.

शहराध्यक्ष ब्राह्मण, मराठा की ओबीसी

पुणे शहरातील विद्यमान शहराध्यक्ष धीरज घाटे यांचा यांचा तीन वर्षाचा कार्यकाळ अद्याप संपलेला नाही. तसेच या कार्यकाळामध्ये विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका आल्याने सध्याच्या कार्यकारणीला अधिकचा वेळ द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

तर दुसरीकडे मागील काळामध्ये ब्राह्मण आणि मराठा समाजातच प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांना शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे यंदा ओबीसी नेता शहराध्यक्ष व्हावा, अशी देखील मागणी करण्यात येत आहे. तसेच जवळपास ओबीसी नेताच शहराध्यक्ष होईल अशा चर्चा भाजपाच्या वर्तुळात पाहायला मिळत आहेत. त्यामुळे सध्या शहरातील आमदार हेमंत रासने, योगेश टिळेकर, श्रीनाथ भिमाले, गणेश बिडकर या ओबीसी नेत्यांची नावे शहराध्यक्ष पदासाठी चर्चेत आहेत.

महाडिक बजावणार महत्त्वाची भूमिका

धीरज घाटेंना कार्यकाळ वाढून मिळणार की ओबीसी नेतृत्वाच्या हाती शहराची कमान सोपवण्यात येणार की मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्याला भाजप शहराध्यक्ष होण्याचा मान मिळणार हे निश्चित करण्यात निरीक्षक म्हणून धनंजय महाडिक यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे. त्यामुळे पुणे शहराच्या शहराध्यक्ष पदाच्या चाव्या कोल्हापूरकराच्या हातात आहेत, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

 yogesh tilekar dhiraj ghate hemant rasane
Satara Politics : नितीन पाटलांची गाडी सुसाट! शरद पवारांना धक्का देत बड्या नेत्याला आणले अजितदादांच्या ताफ्यात

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com