

Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदींना देण्यात येणाऱ्या लोकमान्य टिळक पुरस्काराला जोरदार विरोध केला. त्यापलीकडे जाऊन सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्याच्या हेतुने काही रस्ते बंद करण्यात आल्याचा मुद्दा पुढे करून काँग्रेसच्या नेत्यांनी मोदी पुण्यात येण्याआधीच सिच्या वरिष्ठ नेत्यांनी आंदोलन केले या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी रोखल्याने गोंधळ उडाला. मोदी गो बॅक' आणि पुणे नही मणिपूर जाओ, अशी घोषणाबाजी करत काँग्रेस नेत्यांनी पुण्यातील वातावरण तापवले. पुण्यात स्वागताआधीच मोदींच्या दौऱ्याचा विरोध वाढल्याचे दिसत आहे.
आमदार रवींद्र धंगेकर, पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, नेते मोहन जोशी, माजी मंत्री रमेश बागवे, संजय बालगुड यांच्यासह काहीजण आंदोलनात दिसले. आंदोलनाला पोलिसांनी विरोध केला, त्यानंतर या नेत्यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याला जोरदार विरोध करीत, या नेत्यांनी महात्मा फुले मंडई परिसराकडे. दुसरीकडे, विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनींही दौऱ्याला विरोध केला. या सगळ्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांना अडवले. त्याला न जुमानता कार्यकर्ते आंदोलनावर ठाम राहिले.
मोदींचा पुणे दौरा गाजत असून, त्यावरून राजकीय वर्तुळात धुरळा उडत आहे. अशात मोदींच्या दौऱ्यातील पहिलावहिला कार्यक्रम नवसाला पावणाऱ्या श्रीमंत दगडशेठ हलवाई गणपतीच्या आरतीने होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मोदींच्या पुरस्कारच्या कार्यक्रमात व्यासपिठावर बसण्याची शक्यता आहे. पवार यांनी भूमिका काँग्रेसला पटलेली नाही आणि शिवसेनेला पचलेली नाही. मोदी- पवारांच्या एकत्र येण्यावरून शिवसेनेने पवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.