Ravindra Dhangekar : निवडणुकीनंतर धंगेकर-रासने पहिल्यांदाच एकत्र; शुभेच्छा देत म्हणाले...

Hemant Rasane : कसबा गणपतीच्या तैलचित्राचे अनावरण
Hemant Rasane, Ravindra Dhangekar
Hemant Rasane, Ravindra DhangekarSarkarnama

Pune News : पुण्यातील कसब्याच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे हेमंत रासने यांचा पराभव केला. या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते. मतदान झाल्यानंतर दोघांविरोधातही गुन्हे दाखल झालेले आहेत. या निवडणुकीनंतर आज हे प्रतिस्पर्धी एका कार्यक्रमानिमित्त एकत्र आले होते. त्यांनी हातात हात घेऊन गुढीपाडव्याच्या शुभेच्छाही दिल्या.

खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या विकासनिधीतून पुण्यातील ग्रामदैवत कसबा गणपतीचे तैलचित्र साकारले आहे. त्या तैलचित्राचे गुढीपाडव्याच्या मुहर्तावर अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमानिमित्त आमदार रवींद्र धंगेकर आणि हेमंत रासने यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यावेळी त्यांनी एकमेकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. एकत्रीतपणे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी धंगेकर यांनी खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्यामुळे दोन विरोध उमेदवार एकत्र आले आहेत. त्यांनी समजात समतोल राखत काम केले आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत काम करणार असल्याचे सांगितले.

Hemant Rasane, Ravindra Dhangekar
Jitendra Awhad news: 'रात्रीचं दिसणारा माणूस महाराष्ट्राचा कृषीमंत्री'; आव्हाडांचा सत्तांरांवर हल्ला

हेमंत रासने (Hemant Rasane) यांनी निवडणूक ही एक लोकशाहीतील प्रक्रिया आहे. तेथे कुणी प्रतिस्पर्धी नसतात असे सांगितले. रासने म्हणाले की, "निवडणूक लढविताना कुणी प्रतिस्पर्धी नसतात. ते दोन वेगवेगळ्या मतप्रवाहाचे उमेदवार असतात. आम्ही केलेल्या कामांच्या बदल्यात जनतेकडे मतांच्या रुपात आशीर्वाद मागतो. जनता दोघांनाही अशीर्वाद देते. ज्याला जास्त आशीर्वाद मिळतो तो निवडून येतो. दुसरा त्याच्या पद्धतीने काम करीत असतो. ही स्पर्धा नाही तर लोकशाही प्रक्रियेतील एक भाग आहे."

Hemant Rasane, Ravindra Dhangekar
Ravindra Dhangekar News: लोकसभा लढणार का? धंगेकरांनी स्पष्टच सांगितलं

आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) म्हणाले की, "खासदार बापट यांच्या कार्यामुळे आज आम्ही एकत्र आलो आहोत. त्यांनी तीन दशके पुण्यातील सामाजिक, राजकिय जीवनात काम केले. समाजात काम करताना राजकीय स्तर कसा ठेवावा, तेच आज गुढीपाडवा सणानिमित्त आम्हा दोघांना एकत्र आणून त्यांनी दाखवून दिले आहे. समाजात काम करताना समतोल साधण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यांच्याविरोधात मी दोन विधानसभा निवडणूक लढविल्या आहेत. त्यावेळी त्यांच्या कार्यशैलीचा अभ्यास केला आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकल्याचा प्रयत्न करत आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com