Forest Minister controversy : 'वनमंत्री बदनाम होण्यासाठीच झालो का...'; गणेश नाईकांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय?

Ganesh Naik News : वनमंत्री गणेश नाईक यांनी शिरूरमधील शेतकऱ्यांना भेट दिली. या भेटीनंतर त्यांनी केलेले एक वक्तव्य चर्चेचे केंद्रबिंदू ठरले आहे.
Ganesh Naik
Ganesh NaikSarkarnama
Published on
Updated on

Pune News : गेल्या काही दिवसांपासून शिरूर, जुन्नर, खेड आणि आंबेगाव परिसरात बिबट्यांचा मोठा उपद्रव सुरू आहे. बिबट्यांनी अनेकांना आपले बळी ठरवले आहे. यामुळे स्थानिक नागरिक प्रचंड संतापले होते. त्यांनी रस्ता रोको आंदोलन केले आणि वनविभागाची एक गाडीही जाळली. त्यानंतर राज्य सरकारने बिबटे पकडण्याबाबत अनेक घोषणा केल्या आहेत.

त्यातच आता वनमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी शिरूरमधील शेतकऱ्यांना भेट दिली. या भेटीनंतर त्यांनी केलेले एक वक्तव्य चर्चेचे केंद्रबिंदू ठरले आहे. मी वनमंत्री बदनाम होण्यासाठीच झालो का? असे वाटते, असे ते प्रसार माध्यमाशी बोलताना म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे मनात सुरु असलेली नेमकी खदखद पुढे आली आहे.

Ganesh Naik
BJP Politics: उद्धव ठाकरे यांना ‘डबल शॉक’; ३० वर्ष एक हाती नगराध्यक्षपद सांभाळणारा शिलेदार भाजपवासी!

पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक ते निर्देश दिले आहेत. दोन्ही जिल्ह्यांसाठी प्रत्येकी 11 कोटी रुपये मंजूर केले आहेत. ऊसाची लागवड प्रचंड वाढली आहे, त्यामुळे बिबट्यांना उसाचे क्षेत्र हे आपले घर वाटते, असेही नाईक म्हणाले.

Ganesh Naik
Bhaskar Ambekar Join Shivsena : 'माझी निष्ठा वांझोटी ठरली' उद्धव ठाकरेंचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर शिंदेंच्या शिवसेनेत!

सध्या 200 पिंजरे दाखल झाले आहेत. उरलेले 1000 पिंजरे लवकरच येणार आहेत. वनविभागाची संपूर्ण यंत्रणा सतर्क आहे. 20 बिबटे वनतारा येथे हलवले जाणार आहेत. इतर राज्ये आणि आफ्रिकेतही बिबटे पाठवण्याची योजना आहे. त्यासोबाबतच येत्या काळात नसबंदीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला असून तो अंतिम टप्प्यात आहे.

Ganesh Naik
BJP Politics: उद्धव ठाकरे यांना ‘डबल शॉक’; ३० वर्ष एक हाती नगराध्यक्षपद सांभाळणारा शिलेदार भाजपवासी!

या भागातील बिबटे कोकणातही दिसू लागले आहेत. बंदोबस्त न झाल्यास भटके कुत्रे जसे फिरतात तसे बिबटे फिरतील, अशी भीती नाईक यांनी व्यक्त केली. बिबट्यांच्या हल्ल्यांच्या बातम्या वाचताना मी वनमंत्री बदनाम होण्यासाठीच मंत्री झालो का, असे वाटू लागते. लोकांनी मला दोष दिला तरी चालेल, पण त्यांचा जीव जाऊ नये, असे मतही नाईक यांनी मांडले.

Ganesh Naik
Nagpur Congress News: काँग्रेसचा सुनील केदार अन् बैस यांना मोठा दणका; प्रदेशाध्यक्ष सपकाळानंतर पक्षानेही काढले महत्त्वाचे आदेश

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com