MLA Disqualification Case : ठाकरे गटाच्या वकिलाने युक्तिवाद करताच शिंदे गटाने घेतला हा मोठा आक्षेप…

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : ठाकरे गटाकडून कामत यांच्यासह आठ वकिल युक्तीवादाची लढाई लढत आहेत.
MLA Disqualification Case
MLA Disqualification CaseSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीला विधानसभा अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांच्यापुढे आजपासून सुरुवात झाली. नार्वेकर यांनी पहिल्यांदा ठाकरे गटाच्या आमदारांना बाजू मांडण्याची संधी दिली. ठाकरे गटाच्या वतीने ॲड देवदत्त कामत यांनी बाजू मांडण्यास सुरुवात करताच शिंदे गटाच्या आमदारांनी ठाकरे गटाची कागदपत्रे आम्हाला मिळाली नसल्याचा आक्षेप नोंदविला, त्यावेळी कामत यांनी कागदपत्रं मिळाली नाही तर तुम्ही कशाच्या आधारे युक्तिवाद करणार, असा सवाल केला. (MLA disqualification case: Lawyer of Thackeray group argued, Shinde group took a big objection...)

विधानसभा अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांच्यापुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाचे आमदार वकिलांच्या माध्यामतून आपली बाजू मांडत आहेत. ठाकरे गटाकडून कामत यांच्यासह आठ वकिल युक्तिवादाची लढाई लढत आहेत. एकनाथ शिंदे गटाकडून दोन वकिल खिंड लढवत आहेत.

MLA Disqualification Case
Manoj Jarange Statement: ...तर त्याच दिवशी मी आत्महत्या करेन; मनोज जरांगेंचे मुख्यमंत्र्यांसमोरच ओपन चॅलेंज

नार्वेकर यांनी सुरुवातीला ठाकरे गटाच्या आमदारांच्या मार्फत वकिलांना म्हणणे मांडण्याची संधी दिली. सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे, त्याबाबतची कागदपत्रे आणि ठाकरे गटाच्या १६ आमदारांचे एकत्रित उत्तरे याबाबतची सर्व कागदपत्रे विधानसभा अध्यक्षांकडे सोपविण्यात आलेली आहेत. सुनावणी सुरू होण्यापूर्वी दोन गटाच्या आमदारांना कागदपत्रे सादर करायला सांगितली होती.

ठाकरे गटाकडून यापूर्वी ५०० पानांचा, तर शिंदे गटाकडून पाच हजार पानांचा युक्तिवाद विधानसा अध्यक्षांकडे यापूर्वीच सादर करण्यात आलेला आहे. दोन्ही गटाच्या वकिलांनीही विधानसभा अध्यक्षांकडे कागदपत्रे सादर केली आहेत. ठाकरे गटाचे वकिल कामत यांनी बाजू मांडल्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांनी त्यावर आक्षेप घेतला. शिंदे गटातील आमदारांना अपात्र करण्यात यावे, यासाठी ठाकरे गटाने जी याचिका विधानसभा अध्यक्षांकडे दाखल केली आहे. त्याची कागदपत्रे आहेत, आम्हाला मिळाला नाहीत. त्यामुळे बाजू मांडण्यासाठी आमची अडचण होते आहे, असे त्यांचे म्हणणे होते.

MLA Disqualification Case
Manoj Jarange Andolan : ओरिजनल खानदानी मराठा आहे, ती औलाद माझी नाही; मनोज जरांगेंनी कुणाला सुनावले

शिंदे गटाच्या आमदारांच्या आक्षेपाला ठाकरे गटाच्या आमदारांकडून उत्तर देण्यात आले. तुम्हाला जर कागदपत्रंचं मिळाली नाही, तर तुम्ही कशाच्या आधाराव युक्तिवाद करत आहात, अशी विचारणा केली. सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाकडून देवदत्त कामत यांनीच बाजू मांडली हेाती. तेच विधानसभा अध्यक्षांकडेही ठाकरे गटाचा किल्ला लढवत आहेत. विधानसभा अध्यक्षांकडून दोन्ही गटाचा युक्तीवाद ऐकून घेऊन कागदपत्रे सादर करण्यासाठी आणखी दोन आठवड्याची मुदत देण्यात आली आहे.

MLA Disqualification Case
Sarkarnama Podcast : लातूरकरांचा चिमटा, मातब्बराचा पराभव

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com