Vasant More News : पाच दिवसांपूर्वीच राज ठाकरेंसोबत कार्यक्रम अन् पुन्हा वसंत मोरे नाराज; बॅनरवरुन वादाला तोंड

Vasant More : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस वसंत मोरे यांच्या नाराजीची चर्चा पुन्हा एकदा पुण्यात रंगली आहे.
Vasant More
Vasant MoreSarkarnama
Published on
Updated on

Mns Vasant More News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस वसंत मोरे (Vasant More) यांच्या नाराजीची चर्चा पुन्हा एकदा पुण्यात रंगली आहे. याआधीही मोरेंनी पक्षांतर्गत राजकारणाचा दाखला देऊन पक्ष अध्यक्ष राज ठाकरेंची (Raj Thackeray) भेट घेतली होती. त्यानंतर राज ठाकरेंच्या मध्यस्थीनंतर ही नाराजी दूर झाली होती. मात्र, पुन्हा एकादा बॅनरवरून पुण्यातील मनसे गटात अंतर्गत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मोरेंनी या बॅनरबाबत आपला आक्षेप नोंदवला आहे.

कसबा पेठ भागात मनसेकडून (MNS) रामनवमीच्या निमित्ताने आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. या आरतीसाठी छापण्यात आलेल्या बॅनरवर मनसे सरचिटणीस मोरेंचे नाव किंवा फोटो छापला नसल्यामुळे ही चर्चा सुरु झाली. त्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत मोरेंनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे.

Vasant More
Maharashtra's Leader: एकनाथ शिंदेंसह, महाराष्ट्रातील या नेत्यांनाही मिळालीय 'डी लिट' पदवी

मोरे म्हणाले, ''मला एका मित्राने बॅनरचा फोटो पाठवला आहे. त्यात कोअर कमिटीतल्या ११ जणांपैकी ९ लोकांची नावे आहेत. मला विशेष, याचे वाटले की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कसब्यातले कार्यकर्ते प्रशांत यादव यांच्या उपस्थितीत ही आरती होणार आहे. बॅनरवर त्यांचेही नाव आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माणसाचे नाव त्या बॅनरवर आहे, तर मग मनसे सरचिटणीस वसंत मोरेचे नाव त्या बॅनरवर का नसावे? असा सवाल मोरे यांनी केला.

हे जाणूनबुजून केले जात असल्याचा संशय मोरे यांनी व्यक्त केला. यासंदर्भात वरिष्ठांशी बोलणे झाले असल्याचे ते म्हणाले. मला तरी वाटते की हे जाणून-बुजून केले. कुठेतरी वाद निर्माण करायचा, माझे नाव टाकायचे. वारंवार हे वाद घालायचे आणि काहीतरी वेगळी चर्चा घडवून आणायची हे यांचे सगळे षडयंत्र असल्याचा आरोप, मोरे यांनी केला.

मात्र, मलाही या गोष्टींचा राग येतो. जर या लोकांना एवढा माझा त्रास होत असेल, तर मलाही ठाम भूमिका घ्यावी लागेल. राज ठाकरेंशी मला या गोष्टी बोलाव्या लागतील. एकतर यांना जाब विचारा किंवा मला तरी सांगा की मी काय करू, अशी भूमिका मोरेंनी घेतली आहे.

Vasant More
Narayan Rane vs Uddhav Thackeray : ठाकरे गट मातोश्रीपुरताच मर्यादीत; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांच्या कार्यक्रमाला पाच दिवसांपूर्वीच हजेरी लावली होती. राज ठाकरे यांनी कात्रज येथे उभारण्यात आलेल्या श्वान संगोपन, निर्बिजीकरण केंद्राला भेट दिली होती. राज ठाकरे यांच्या कार्यक्रमानंतर पाच दिवसांनीच पुन्हा वसंत मोरेंच्या नाराजीची चर्चा सुरु झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com