Tanaji Sawant : नाराज तानाजी सावंत नागपूरचे अधिवेशन सोडून तातडीने पुण्यात दाखल

Tanaji Sawant Leaves Nagpur Legislative Session : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मंत्रिपदासाठी संधी मिळत नसल्याचे पाहून सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शिंदेंकडे फिल्डिंग लावली होती. मात्र, फडणवीस यांच्याकडून प्रयत्न करूनही मंत्रिमंडळात सावंत यांना संधी मिळू शकलेली नाही.
Tanaji Sawant
Tanaji SawantSarkarnama
Published on
Updated on

Pune, 16 December : महायुती सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने नाराज झालेले माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत अधिवेशन सोडून पुण्यात दाखल झाले आहेत. तब्येत बरे नसल्याचे कारण सांगून सावंत हे नागपूरहून थेट पुण्याला आले आहेत. त्यामुळे सावंत यांच्या माघारीमागे तब्येतीचे कारण आहे की मंत्रिपद न मिळाल्याची नाराजी आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

महायुती सरकारचा (Mahayuti) पहिला मंत्रिमंडळ विस्तार रविवारी (ता. १५ डिसेंबर) नागपुरात झाला. मागील मंत्रिमंडळात असलेले तानाजी सावंत, अब्दुल सत्तार आणि दीपक केसरकर यांना पुन्हा संधी नाकारण्यात आली आहे. यातील माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मंत्रिमंडळात समावेश व्हावा, यासाठी शेवटपर्यंत जोरदार प्रयत्न केले.

एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांना तब्बल पाच तास प्रतीक्षा करावी लागली होती. तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मंत्रिपदासाठी संधी मिळत नसल्याचे पाहून सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शिंदेंकडे फिल्डिंग लावली होती. मात्र, फडणवीस यांच्याकडून प्रयत्न करूनही मंत्रिमंडळात सावंत यांना संधी मिळू शकलेली नाही.

Tanaji Sawant
Solapur Politic's : सोलापूरच्या नशिबी पुन्हा उपरा पालकमंत्री....

महायुतीच्या नेत्यांनी मंत्रिमंडळातील नावे शेवटपर्यंत गुलदस्त्यात ठेवली होती. त्यामुळे महायुतीचे बहुतांश सर्व आमदार शपथविधी सोहळ्यासाठी नागपुरात दाखल झाले होते. पण, साधारणपणे दुपारी तीननंतर मंत्रिमंडळात नावे बाहेर आली, त्यामुळे अनेकांच्या अपेक्षेवर पाणी फेरले आहे. त्यात सावंत यांचाही पत्ता कट झाल्याचे स्पष्ट झाले, त्यामुळे सावंत हे नाराज झाले होते.

Tanaji Sawant
Western Maharashtra : महायुतीच्या मंत्रिमंडळावर पश्चिम महाराष्ट्राचे वर्चस्व; उपमुख्यमंत्र्यांसह दहा मंत्रिपदे!

मंत्रिमंडळात संधी मिळाली नसल्याचे पाहून आमदार तानाजी सावंत हे रविवारी रात्रीच तातडीने नागपूरहून पुण्याकडे रवाना झाले. रात्री उशिराच ते पुण्यात दाखल झाले आहेत. आपली तब्येत बरी नसल्याने आपण पुण्याला परत आलो आहे, असे कारण सावंत यांनी सांगितले आहे. कोलेस्टोरेल वाढल्यामुळे तानाजी सावंतांना डॉक्टरांनी पूर्णवेळ विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. मंत्रिपद न मिळाल्याने आपण नाराज नाही, असेही सावंत यांच्याकडून स्पष्ट करण्यत आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com