Solapur Politic's : सोलापूरच्या नशिबी पुन्हा उपरा पालकमंत्री....

Maharashtra Cabinet : महाविकास आघाडी आणि महायुती सरकारने गेल्या पाच वर्षांत सोलापूरला मंत्रिपदापासून डावलेले होते. त्यानंतर एवढं मोठं यश मिळाल्यानंतरही सोलापूरला पुन्हा एकदा मंत्रिपदाने हुलकावणी दिल्याने जिल्ह्यात नाराजीची भावना आहे.
Chandrakant Patil-jaykumar Gore-Dattaray Bharane
Chandrakant Patil-jaykumar Gore-Dattaray BharaneSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 15 December : सोलापूरला मंत्रिपदाने पुन्हा एकदा हुलकावणी दिली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सोलापूरकरांनी भाजपला तब्बल पाच जागा निवडून दिल्या आहेत. त्या अगोदर 2019 मध्येही सोलापूरने महायुतीचे तब्बल सहा आमदार निवडून दिले होते, तरीही सोलापूर मंत्रिपद मिळू शकले नव्हते. त्यामुळे सोलापूरला पालकमंत्रीही स्थानिक मिळू शकला नव्हता. महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी शक्यता व्यक्त होत असतानाच सोलापूरला पुन्हा एकदा मंत्रिपद मिळू शकलेले नाही, त्यामुळे सोलापूरच्या नशिबी पुन्हा एकदा किमान अडीच वर्षे तरी उपरा पालकमंत्री असणार हे निश्चित आहे.

विधानसभा निवडणुकीत सोलापूरमधून (Solapur) विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, देवेंद्र कोठे, समाधान आवताडे हे पाच आमदार कमळाच्या चिन्हावर निवडून आले आहेत. यातील दोन्ही देशमुख आणि सचिन कल्याणशेट्टी यांचे नावे मंत्रिपदासाठी चर्चेत होते. मात्र, या तिघांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळू शकलेले नाही. वास्तविक दोन देशमुखांच्या वादात कल्याणशेट्टी यांना लॉटरी लागेल अशी चर्चा होती. मात्र, तीही फोल ठरली आहे.

दोन देशमुखांच्या वादावर गेल्या काही वर्षांपासून पक्षश्रेष्ठींनीही अनेकदा नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतरही दोन देशमुखांमध्ये समेट घडू शकलेला नव्हता. तसेच, ज्युनिअर असलेल्या कल्याणशेट्टी यांच्या मंत्रिपदाला कोणाचा विरोध होता, हे थोड्याच दिवसांनी पुढे येईल. मात्र, भाजपमधील (BJP) अंतर्गत भांडणात सोलापूरचे नुकसान होत असल्याचे स्पष्ट आहे.

Chandrakant Patil-jaykumar Gore-Dattaray Bharane
Western Maharashtra : महायुतीच्या मंत्रिमंडळावर पश्चिम महाराष्ट्राचे वर्चस्व; उपमुख्यमंत्र्यांसह दहा मंत्रिपदे!

मागील पंचवार्षिकमध्ये प्रथम महाविकास आघाडीने सोलापूरला मंत्रिपदामध्ये डावलले होते. त्यावेळी सोलापूरच्या पालकमंत्रिपदी प्रथम दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड, त्यानंतर हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्री म्हणून काम केले. त्यानंतर महायुती सरकारमध्ये सोलापूरला मंत्रिमंडळात स्थान मिळू शकले नव्हते, त्यामुळे प्रथम राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी सोलापूरचे पालकमंत्रिपद भूषविले आहे.

महाविकास आघाडी आणि महायुती सरकारने गेल्या पाच वर्षांत सोलापूरला मंत्रिपदापासून डावलेले होते. त्यानंतर एवढं मोठं यश मिळाल्यानंतरही सोलापूरला पुन्हा एकदा मंत्रिपदाने हुलकावणी दिल्याने जिल्ह्यात नाराजीची भावना आहे. विशेषतः ज्या भाजपला सोलापूरकरांनी भरभरून मतरूपी दान केले, त्या भाजपकडून सोलापूरकडे दुर्लक्ष झाल्याने सोलापूरकरांना आश्चर्य वाटत आहे.

Chandrakant Patil-jaykumar Gore-Dattaray Bharane
Mahayuti Cabinet : महायुतीच्या 39 आमदारांना मंत्रिमंडळात संधी; हे आहेत कॅबिनेट अन्‌ राज्यमंत्री!

हे तिघे पालकमंत्रिपदासाठी चर्चेत

भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील आणि इंदापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रेय भरणे यांना महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. या दोघांनीही सोलापूरचे पालकमंत्री म्हणून काम केले आहे. त्यामुळे या दोघांपैकी एकावर सोलापूरच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी येऊ शकते. याशिवाय माढा लोकसभा मतदारसंघात येणारे माण खटावचे जयकुमार गोरे यांना सोलापूरची जबाबदारी दिली जाऊ शकते. त्यांच्या माध्यमातून हातातून निसटलेला माढा लोकसभा पुन्हा मिळविण्याचा प्रयत्न भाजपकडून होऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com