Farmer Loan waiver : दिवाळीत मिळाली शेतकऱ्यांना आनंदाची बातमी! खात्यात ४ हजार ७६५ कोटी रुपये जमा

Loan waiver Farmer : सरकारच्या कर्जमुक्ती योजनेचा लाभ आत्तापर्यंत एकूण २०.७२ लाख पात्र शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात ७८.९४ कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे.
Loan waiver Farmer
Loan waiver Farmersarkarnama
Published on: 
Updated on: 

Farmers News : ऐन दिवाळीत शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मिळाली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत आज ४.८७ लाख पात्र शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यात ४ हजार ७६५ कोटी रुपयांची कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या एकूण २०.७२ लाख पात्र शेतकऱ्यांना १८ हजार ४० कोटी रुपयांचा कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील १२ हजार ८८६ शेतकऱ्यांना ७८.९४ कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे.

महाराष्ट्र शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित करण्यात आलेल्या आणि ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या तसेच ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेल्या पीक कर्ज आणि पुनर्गठित अथवा फेरपुनर्गठित कर्जासाठी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येत आहे.

योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत असून, यासाठी शासनाने महाआयटीची नियुक्ती केली आहे. महाआयटीने विकसित केलेल्या योजना पोर्टलवर बँकांकडून एकूण ३१.१७ लाख थकीत कर्जखात्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे.

Loan waiver Farmer
Satej Patil : सतेज पाटील 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये, मुंबईत दाखल; सरकार विरोधात डाव टाकणार, 'गोकुळ' राज्यभर गाजणार!

महाआयटीमार्फत संगणकीय प्रक्रियेद्वारे तपासणी करण्यात आलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत चार याद्यांमध्ये एकूण २५ लाख ८२ हजार ८२७ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या यादीत १६ लाख ९६ हजार २०१, दुसऱ्या यादीत ४ लाख १९ हजार ७३७, तिसऱ्या यादीत ३ लाख ५१ हजार १९२ आणि चौथ्या यादीत १ लाख १५ हजार ६९७ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यात ४ हजार ७६५ कोटी

यापूर्वी आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या १५.८५ लाख पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये १३ हजार २७५ कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. आता आणखी ४.८७ लाख पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ४ हजार ७६५ कोटी रुपये जमा करण्यात येत आहेत.

अशा प्रकारे आतापर्यंत एकूण २०.७२ लाख पात्र शेतकऱ्यांना १८ हजार ४० कोटी रुपयांचा कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येत आहे. पात्र शेतकरी लाभार्थी आणि त्यांना मिळणाऱ्या लाभाच्या रकमेची विभाग व जिल्हानिहाय चौकशी यादी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Loan waiver Farmer
Farmer Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीची चौथी यादी जाहीर! राज्यातील 1 लाख 15 हजार शेतकऱ्यांना दिलासा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.