Sharad Pawar Threat Case: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकी दिल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी मंगळवारी सकाळी (१२ जून) सागर बर्वे नावाच्या तरुणाला अटक केली. शरद पवार यांना ट्विटच्या माध्यमातून धमकी देण्यात आली होती. पण जीवे मारण्याच्या धमकीचे कलम ट्विटबाबत लागू होते का, या प्रकरणी पोलिस कायदेशीर सल्ला घेत आहेत.
दरम्यान प्राथमिक तपासानुसार, शरद पवार यांना देण्यात आलेल्या धमकीचा मजकूर हा महाराष्ट्राचे राजकारण या फेसबुक ग्रुपमध्ये नर्मदाबाई पटवर्धन या खासगी युजरच्या अकाऊंचवर लिहीण्यात आला होता. या संदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी फेसबुकशीही संपर्क साधला आहे. सागर बर्वे हा औषधनिर्माण शास्त्रातील पदवीधर आहे.त्याने नर्मदाबाई पटवर्धन नावाने फेसबुकवर बनावट प्रोफाईल तयार केलं होतं. यावरुन त्याने थेट खासदार सुप्रिया सुळे यांना मेसेज करत शरद पवार यांना धमकी दिली होती. ' तुमचा लवकरच दाभोळकर होणार ... ' अशा आशयाचा मजकूर या मेसेजमध्ये होता. (Sharad Pawar Threat Case)
बनावट ई - मेल आयडीच्या माध्यमातून हे बनावट प्रोफाईल तयार केलं होते. याचबनावट अकाऊंटवरुन त्याने हा प्रकार का केल्याची माहिती आहे. याबाबत पोलीस आणखी तपास करत आहेत. पण बर्वेने त्याच्यावरील सर्व आरोप चौकशीत फेटाळून लावले आहेत. पण पोलिसांचा तपास हा तंत्रज्ञानाद्वारे मिळणाऱ्या पुराव्यांवर अवलंबून आहे. (Maharashtra Politics)
यासोबतच, ट्विटरवरील सौरभ पिंपळकर या ट्वीटर अकाउंटवरून औरंगजेबाशी शरद पवार यांची तुलना करणारे ट्वीट करण्यात आले होते.याप्रकरणी पिंपळकर या नावाने प्रोफाईल वापरणाऱ्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला होता.पण ते ट्वीट बदनामीकारक असले तरी त्यात जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली नाही, असे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. (Political news)
त्यामुळे पिंपळकर या प्रोफाईलवरून करण्यात आलेले ट्विटला जीवे मारण्याचे धमकी देण्याचे कलम लागू शकेल की नाही, याबाबत पोलीस कायदेशीर सल्ला घेत आहेत. यासाठी पोलिसांनी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संपर्क साधला आहे. पिंपळकरने या ट्वीटर आयडीवरून पवार यांच्याशिवाय आणि काही धमकीचे ट्विट केले होते का, याची माहिती मागवण्यत येत आहे.
या प्रकरणी सरकारनामा'शी बोलताना असीम सरोदे म्हणाले की, ''कोणत्याही प्रकारची धमकी असेल आणि ती कशावरुनही दिली असेल, जेव्हा अशा घटनांची पार्श्वभूमी असते, जेव्हा अशा पद्धतीने काही मोठ्या लोकांना मारण्यात आलेलं आहे. तेव्हा त्या धमक्या गांभार्याने घेण्याची गरज असते. कारण ज्या मोठ्या पदावरील आणि प्रतिष्ठीत लोकांना अशी धमकी दिली जाते. त्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न असतो. जरी एखाद्या फेक अकाऊंटवरुन धमकी दिली असेल, तरी त्यामागे गुन्हेगारी कटकारस्थान करणारी काही लोक असू शकतात. अशा लोकांची गुन्हा करण्याची पद्धतही अशी असते. म्हणजे पाच-दहा वेळा धमक्या द्यायच्या, कोणी दखल घेतय की नाही पाहायचं आणि कोणी दखल घेत नसेल तर पुढची स्टेप घ्यायची, अशा प्रकारे काहीजण करु शकतात, त्यामुळे अशा धमक्यांची गंभीर दखल घेऊन त्या दृष्टीने कारवाई करणं हे पोलिसांचं कामच आहे.
म्हणजेच हे कलम ट्विटबाबत लागू होतं का?
कलम कसं लागू होतं, याचा बऱ्याचदा संबंध नसतो. धमकी कोणाला दिली आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे, धमकी देणाऱ्याने काय धमकी दिली आहे. यापुर्वी तशा घटना घडल्या आहेत का, या गोष्टींचाही विचार करणे गरजेचे आहे. शरद पवार यांना ज्या पद्धतीने धमकी देण्यात आली, की तुझा दाभोळकर करु, तर या पुर्वी डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांना तशा पद्धतीने मारण्यात आलं आहे, या वास्तव गोष्टी आहेत. त्यामुळे अशा धमक्यांची गंभीरता लक्षात घेऊन त्यावर कारवाई करणं हे पोलिसांचं कामच आहे, असंही असीम सरोदे यांनी म्हटलं आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.