गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी हात जोडून केली ही विनंती...

राष्ट्रीय वयोश्री व दिव्यांग योजनांची आंबेगाव विधानसभा मतदार संघात सुमारे २० हजार लाभार्थी नावनोंदणीचे उद्दिष्ठ आहे.
Dilip Walse Patil
Dilip Walse PatilSarkarnama
Published on
Updated on

मंचर (जि. पुणे) : आपल्या आयुष्यात वंचित माणसाला मदत करणे, हाच खरा परमार्थ आहे. राष्ट्रीय वयोश्री व दिव्यांग योजनांची आंबेगाव विधानसभा मतदार संघात प्रभावीपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. सुमारे २० हजार लाभार्थी नावनोंदणीचे उद्दिष्ठ आहे. राजकारणविरहितच काम करण्याचे पहिल्यापासून माझे धोरण आहे. सर्वाना हात जोडून विनंती आहे की, कोणत्या पक्षाचा न पाहता वंचितांना लाभ मिळून द्या. या कामामुळे तुम्हाला निश्चितच आनंद मिळेल. प्रशासनासोबत सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे, त्यासाठी विशेष यंत्रणा कार्यरत केली जाईल,”असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी सांगितले. (Don't look for parties while helping the deprived : Dilip Walse Patil)

आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे राष्ट्रीय वयोश्री व दिव्यांग योजना आढावा बैठकीत वळसे पाटील बोलत होते. ते म्हणाले की, वयाची ६० वर्षे पूर्ण झालेल्या व दिव्यांग असलेल्यांना केंद्र व राज्य सरकारच्या वतीने विविध योजना राबविल्या जातात. पूर्वा वळसे पाटील व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे चांगले सहकार्य मिळत आहे. ऑनलाईन नाव नोंदणीसाठी भीमाशंकर कारखाना, शरद बँक, बाजार समिती, पंचायत समिती, अनुसया महिला उन्नती केंद्र, महा-ई सुविधा केंद्रांची मदत घेतली जाईल.

Dilip Walse Patil
राजकारण बाजूला ठेवत भाजप उपाध्यक्षाने केला आमदार अशोक पवारांचा सत्कार!

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या आजीव सदस्या पूर्वा वळसे पाटील म्हणाल्या की, दिव्यांग व वयोश्री योजनेची जनजागृती होण्यासाठी गृहमंत्री वळसे पाटील यांनी मदत करावी. विविध ३२ प्रकारची सहाय्यक साधने लाभार्थ्यांना मोफत मिळू शकतात. खासदार सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदार संघात या योजनांच्या माध्यमातून वर्ल्ड रेकॉर्ड करणार आहेत. त्यांचा आदर्श घेऊन आंबेगावमध्ये काम सुरु केले आहे.

Dilip Walse Patil
आमदार संजय शिंदे-प्रशांत परिचारकांच्या मैत्रीची दूध पंढरीच्या आखाड्यातून नवी सुरुवात!

दिव्यांग लाभार्थींना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सेल्फी विथ स्मार्ट फोन मिळणार आहे. इलेक्ट्रॉनिक तीन चाकी गाडी, तीन चाकी सायकल, जयपूर कृत्रिम पाय, वयोश्रीसाठी कानाचे मशीन, काठी कमोड सायकल, खुर्ची, दाताची कवळी, चष्मा, मानेचा व पाठीचा पट्टा आदी साहित्य मोफत मिळणार आहे, असे शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी सांगितले.

Dilip Walse Patil
राणेंची प्रतिष्ठा पुन्हा पणाला; नगराध्यपदासाठी समर्थकाचा भाजप उमेदवारापुढे शड्डू!

या वेळी शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, विष्णू हिंगे, देवदत्त निकम, विवेक वळसे पाटील, शिवाजीराव ढोबळे, बाळासाहेब बाणखेले, सुभाष मोरमारे, संजय गवारी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com