Raj's Reaction on Maratha reservation मराठा आरक्षणाच्या मंजुरीवर राज ठाकरेंची प्रतिक्रिया; ‘हा आनंद मानण्यासारखा निर्णय नाही’

Maratha reservation : राज्य सरकारकडून तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू आहे. राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार आहे का?
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून राज्य सरकारने आज मराठा समाजाला एकमताने आरक्षण मंजूर केले आहे. त्याबाबत संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. हे मराठा आरक्षण टिकणार का, असा सवाल खुद्द मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे. दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे का?, असा सवाल करत हा आनंद मानण्यासारखा विषय नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. (Maharashtra Assembly Session )

राज ठाकरे म्हणाले, राज्य सरकारकडून तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू आहे. राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार आहे का?, हा अधिकार केंद्र सरकारचा आहे. ही सर्वोच्च न्यायालयातील निर्णयाची गोष्ट आहे. हा खूप टेक्निकल विषय आहे. सरकारने आरक्षण जाहीर केलं म्हणजे आनंद मानण्यासारखा विषय नाही. मराठा समाजाने जागृत राहावं. हे नक्की काय आहे, हे मराठा समाजाने सरकारला विचारावं. (Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Raj Thackeray
Assembly special session 2024 LIVE Updates: मराठा आरक्षण टिकेल का? जरांगेंना शंका

दहा टक्के मराठा आरक्षण दिलं; म्हणजे काय केले. कशातून हे दहा टक्के आरक्षण दिलं आहे. तुम्हाला अधिकार कोणी दिले. तुम्हाला आरक्षण देण्याचा अधिकार आहे का? का पुन्हा हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाणार आणि राज्य सरकार सांगणार की हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आहे. आता आम्ही काही करू शकत नाही. निवडणुकीच्या तोंडावर या सर्व गोष्टी करण्याला काही एक अर्थ नाही, असे विधानही राज ठाकरे यांनी केले. (Maratha Aarakshan Laws)

राज म्हणाले, फडणवीस सरकारने जे केले तेच आता केले जात आहे. मुळात राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार आहे का? देशातील अनेक राज्यांत आरक्षणाचा विषय प्रलंबित आहे. एका राज्यापुरतं असं करता येत नाही. मराठा समाजानेही त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

Raj Thackeray
Maratha Reservation : मराठा आरक्षण न्यायालयात टिकवण्यासाठी सरकारचा 'हा' खास प्लॅन!

सध्या काय सुरू आहे, हेच कळत नाही. राज्यासमोर दुष्काळ आणि पाण्याचा विषय मोठा आहे. पण, निवडणुका आणि राजकारणाकडे लक्ष वेधायचे आणि मूळ गोष्टींपासून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवायचं, असं सारं सुरू आहे. याशिवाय या देशात आणि राज्यात दुसरं काही चालू आहे का,? असा सवालही राज ठाकरे यांनी केला.

R

Raj Thackeray
Maratha Reservation LIVE Updates : सगेसोयरे अधिसूचनेचे काय होणार? जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com