Pune Drugs Cases
Pune Drugs CasesSarkarnama

Pune Drugs Case : पुण्यात चाललंय तरी काय? एक कोटीचे ड्रग्स पुन्हा सापडले

Drugs worth Rs one crore : पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातून पोलिसांनी एक कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे. लोहगाव परिसरातील विघ्नहर्ता ‘अपार्टमेंट’मधून तीन तरुणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एक कोटी रुपयांचे 471 ग्रॅम ड्रग्स हस्तगत करण्यात आले आहे.
Published on

Pune News : गेल्या काही दिवसांपासून पुण्यामधील ड्रग्सचा प्रश्न मोठा गंभीर झाला आहे. ड्रग्स प्रकरणं पुण्यातून सातत्याने समोर येत असल्याने ड्रग्स रॅकेटचा विळखा शहराला बसला असल्याचं स्पष्ट होत आहे.

काही दिवसापूर्वी हॉटेलमध्ये ड्रग सेवनाचा प्रकार समोर आल्यानंतर आता पुन्हा एक कोटी रुपयांचे ड्रग्स पुणे पोलिसांच्या हाती लागले आहे.

काही महिन्यांपूर्वी ललित पाटील ड्रग्स प्रकरण समोर आलं होतं. त्यानंतर लगेचच पुण्याजवळील (Pune) एका एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जनिर्मिती (Drugs) होत असून त्याचं इंटरनॅशनल रॅकेट सुरू असल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झालं होतं. या घटनेनंतर काही दिवसांतच लगेच पुण्यातील ‘एफसी रोड’ वरील एका हॉटेलमध्ये ड्राक्स पार्टी सुरू असल्याचं व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले आहे.

पुण्यातील एफसी रोडवरील एका नामांकित हॉटेलमधील व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओमध्ये काही तरुण बाथरूममध्ये ड्राक्स घेताना आढळून आले. त्यानंतर मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडल्या.

आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण झालं आणि मुख्यमंत्र्यांनी (Chief Minister) थेट हे रॅकेट उखडून टाकण्याची भाषा देखील गेली. मात्र त्यानंतर काही दिवसांतच कोट्यवधींचे ड्रग्स पुण्यातून पोलिसांच्या हाती लागले आहे.

Pune Drugs Cases
BJP Vs Shivsena UBT : अर्धवटराव, बालिश, विनोदबुद्धी अन् थेट ठाकरेंच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह; बावनकुळे नेमकं काय म्हणाले?

पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातून पोलिसांनी एक कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे. या प्रकरणामध्ये तिघांना अटक करण्यात आली आहे. लोहगाव परिसरातील विघ्नहर्ता ‘अपार्टमेंट’मधून तीन तरुणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एक कोटी रुपयांचे 471 ग्रॅम ड्रग्स हस्तगत करण्यात आले आहे.

गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये श्रीनिवास संतोष गोदजे, रोहित शांताराम बेंडे आणि निमिश सुभाष अभनावे अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Drugs Cases
Ajit Pawar : "भुजबळ प्रचाराला जातील त्या मतदारसंघातील नेता पाडा", जरांगे-पाटलांचं विधान अन् अजितदादा म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com