Pune News, 14 Dec : काही वर्षांमध्ये राज्यभरामध्ये सर्वत्र खाजगी शाळांचे पेव आलं आहे. या खाजगी शाळांचे संस्था चालक आणि प्रशासन मनमानी पद्धतीने कारभार करताना पाहायला मिळत आहेत. यामुळे विद्यार्थी आणि पालक त्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत शिक्षण विभागाने कठोर कारवाई करत दोन शाळांची मान्यता रद्द केली आहे.
शिक्षण विभागाने ही मोठी कारवाई करत मुंबईतील दोन शाळांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीमती मनरादेवी एज्युकेशन संस्था आझादवाडी, दामू नगर, कांदिवली पूर्व मुंबई, तर हनुमंत विद्यामंदिर शाळा कावरपाडा सातीवली पूर्व केंद्र, वालीव तालुका वसई, जिल्हा पालघर इंग्रजी माध्यम आणि हिंदी माध्यम अशी या कारवाई करण्यात आलेल्या शाळेची नावं आहेत.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ मधील तरतुदीनुसार विहित केलेली मानके व प्रमाणके यांची पूर्तता करीत नसल्याने तसेच विद्यार्थ्यांच्या हिताला बाधा पोहविणारी कृती केल्याने, महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क प्रगती नियमा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक शिक्षा करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला असताना देखील शाळेतील शिक्षिकेने विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा दिली. त्यामुळे एका विद्यार्थिनीचे निधन झाले आहे. तसेच या दोन्ही शाळांमध्ये शिकवित असलेल्या काही शिक्षकांच्या शैक्षणिक अर्हता व व्यावसायिक पात्रता निकषाप्रमाणे दिसून आल्या नाहीत.
त्यामुळे या शाळांचा शैक्षणिक दर्जा खालच्या दर्जाचा असल्याचे व परिणामी विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कास बाधा पोहचत आहे. त्या सोबतच या शाळेची बांधकाम परवानगी देखील नव्हती. दोन्ही शाळांमध्ये इयत्ता नववी इयत्ता दहावी या वर्गांची परवानगी नसतानाही अनाधिकृतपणे हे वर्ग चालवण्यात येत आहेत.
सरकारच्या नियमानुसार या शाळेत सखी सावित्री समिती त्याचबरोबर माता पालक समिती स्थापन नाही. असे अनेक ठपके ठेवत या शाळांची मान्यता शिक्षण विभागाने रद्द केली. शिक्षण विभागाच्या या कारवाईमुळे अनेक संस्थाचालक व मुख्याध्यापक यांचे धाबे दणाणले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.