BJP Victory :भाजपने मंगळवेढ्यात विजयाचे खाते उघडले; आमदार समाधान आवताडेंना बंधूकडून वाढदिवसाचे गिफ्ट

Mangalvedha Nagar Parishad Election 2025 : मंगळवेढा नगरपालिकेच्या निवडणुकीत भारत नागणे यांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपचे सोमनाथ आवताडे बिनविरोध निवडले. त्यामुळे मंगळवेढ्यात भाजपने पहिले यश मिळवले आहे.
Samadhan Autade
Samadhan AutadeSarkarnama
Published on
Updated on

मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीत प्रभाग 3 मधून सोमनाथ आवताडे यांची बिनविरोध निवड झाली असून भाजपने पहिले यश मिळवले.
उमेदवारी अर्ज माघारीनंतर नगराध्यक्षपदासाठी 3 आणि नगरसेवक पदासाठी 58 उमेदवार रिंगणात राहिले.
अर्ज माघारीच्या प्रक्रियेदरम्यान पोलिस सुरक्षा आणि राजकीय तडजोडी दिसून आल्या; काही उमेदवारांची डोळे पाणावली.

Mangalvedha, 21 November : मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रभाग तीनमधील तीर्थक्षेत्र विकास आघाडीतील भारत नागणे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आमदार समाधान आवताडे यांचे चुलत बंधू भाजपचे सोमनाथ आवताडे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. आवताडे यांच्या बिनविरोध निवडीमुळे मंगळवेढा नगरपालिकेत भाजपने विजयाचे खाते उघडले आहे.

मंगळवेढा (Mangalvedha) नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी माघारीनंतर नगराध्यक्षपदासाठी तीन, तर नगरसेवक पदासाठी 58 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी आता भाजप विरोधात तीर्थक्षेत्र विकास आघाडी असा सामना होणार आहे.

मंगळवेढ्यात नगराध्यक्षपदासाठी 13, तर नगरसेवकपदासाठी 140 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. गुरुवारी दोघांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले होते. आज माघारीच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या (NCP SP)उमेदवार शुभांगी कौंडुभैरी, अपक्ष प्रा. तेजस्विनी कदम, प्रणाली आवताडे, माधवी किल्लेदार, क्रांती दत्तू, अरुणा माळी, सुवर्णा चेळेकर, माधुरी कट्टे, संगीता कट्टे, राजश्री चेळेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले.

नगरसेवकपदाच्या अर्जातील प्रभाग तीन मधील तीर्थक्षेत्र विकास आघाडीतील भारत नागणे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर सोमनाथ आवताडे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. काही अपक्ष उमेदवारांकडून पॅनेलमधील उमेदवाराच्या विजयात अडचण निर्माण होऊ नये; म्हणून उद्योगपती संजय आवताडे, राष्ट्रवादीचे अजित जगताप, प्रवीण खवतोडे, मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुशीला आवताडे, शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रतिक किल्लेदार हे नगरपालिकेत ठाण मांडून होते.

Samadhan Autade
Shirur Politic's : अशोकबापूंनी शिरूर नगरपालिका टप्प्यात आणली; धारिवाल गटाची मिळाली साथ : अजितदादांच्या आमदारापुढे कडवे चॅलेंज

नगराध्यक्षपदाच्या अर्जातील 10, तर नगरसेवक पदाच्या अर्जातील 37 अर्ज माघार घेतल्याने निवडणुकीच्या आखाड्यात सुजाता जगताप, सुनंदा अवताडे, राजामती कोंडुभैरी हे नगराध्यक्ष पदासाठी तर 19 नगरसेवक पदासाठी 58 उमेदवारी अर्ज आखाड्यात राहिले. अर्ज माघारी घेणाऱ्या उमेदवारांकडून निवडणूक निर्णय अधिकारी मदन जाधव हे कुणाच्या दबावातून अर्ज मागे घेत आहात का? याची विचारपूस करत होते.

उमेदवारांवर कोणत्याही प्रकारचा दबाव येऊ नये, या दृष्टिकोनातून पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे, फौजदार नागेश बनकर, दिगंबर गेजगे, पोलिस पथकासह नगरपालिका कार्यालयात ठाण मांडून होते. निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या काही उमेदवारांना राजकीय तडजोडींमुळे उमेदवारी अर्ज माघारी घ्यावी लागली, त्यावेळी काही उमेदवारांचे डोळे पाणावले.

Samadhan Autade
Satara Politic's : कऱ्हाडमध्ये मोठी राजकीय घडामोड; शिंदेसेनेच्या मोठ्या नेत्याने घेतली पृथ्वीराज चव्हाण यांची भेट, साताऱ्यात खळबळ

चुलत बंधूला बिनविरोध नगरसेवक करण्यात आमदारांना यश

प्रभाग तीनमधून सोमनाथ आवताडे हे बिनविरोध निवडून आल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी शिवालयात गुलालाची उधळण केली. शहरातून मिरवणूक काढत जल्लोष केला. आमदार समाधान आवताडे यांचा आज वाढदिवस असून वाढदिवसाच्या निमित्ताने आमदारांनी चुलत बंधूला बिनविरोध नगरसेवक करून वाढदिवसाची भेट दिली आहे.

Q1. सोमनाथ आवताडे बिनविरोध कसे निवडून आले?
A. प्रभाग 3 मधील प्रतिस्पर्धी उमेदवार भारत नागणे यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे.

Q2. आता नगराध्यक्षपदासाठी कोणता सामना आहे?
A. भाजप विरुद्ध तीर्थक्षेत्र विकास आघाडी असा सामना आहे.

Q3. अर्ज माघारीनंतर किती उमेदवार मैदानात आहेत?
A. नगराध्यक्षपदासाठी 3 आणि नगरसेवक पदासाठी 58 उमेदवार अंतिम मैदानात आहेत.

Q4. या घटनेचा आमदार समाधान आवताडे यांच्याशी काय संबंध आहे?
A. त्यांच्या चुलत भावाला बिनविरोध निवडून आणण्यात आमदारांचे यश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com