Eknath Khadse: 'पुणे रेव्ह पार्टी'वरुन खडसेंचे पोलिसांवर गंभीर आरोप; काही तासांतच आयुक्त अमितेश कुमारांनी खरी बाजू सांगितली

Eknath Khadse on Pune Police : विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेत याप्रकरणी पोलिस तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ते म्हणाले, ज्या ठिकाणी संगीत नाही, गोंधळ किंवा आदळआपट नाही. डान्स नाही. एका घरात सातजण बसले आहेत, आणि त्यांची पार्टी सुरु आहे....
Amitesh Kumar On Eknath khadse .jpg
Amitesh Kumar On Eknath khadse .jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे पोलिसांनी खराडी परिसरातील एका कथित रेव्ह पार्टीवर रविवारी पहाटे छापा टाकला होता. या कारवाईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह सात जणांना अटक करण्यात आली. न्यायालयाने सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत मंगळवारी (ता.29) एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी त्यांनी पुणे पोलिसांवर गंभीर आरोप करतानाच तपासावरही शंका उपस्थित केली. खडसे यांनी सांगितले की, त्यांच्या जावयाने त्यांना पाळत ठेवल्याची माहिती समोर आली आहे. पाळत ठेवल्याचा पुरावा असलेले सीसीटीव्ही फुटेज त्यांच्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला.

पोलिसांनी योजनाबद्धरित्या त्यांची प्रतिमा डागळण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाईलमधून कौटुंबिक फोटो बाहेर पाठवण्याचा आरोप देखील खडसे यांनी केला आहे. या सगळ्या प्रकरणांमध्ये आपण पोलिसांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.

यानंतर आता कोणीच पुणे पोलीस (Pune Police) आयुक्त अमितेश कुमार यांची भूमिका पुढे आली आहे. खराडी रेव्ह पार्टी प्रकरणांमध्ये जे काही आरोप होत आहेत. ते सगळे बसलेस एलिगेशन आहे. पोलिसांनी अत्यंत पारदर्शक पणे कारवाई केली असून नियमानुसार आरोपींवर कायदेशीर कारवाई देखील होईल.

Amitesh Kumar On Eknath khadse .jpg
Amit Shah vs Rahul Gandhi : अमित शहांकडून संसदेतच राहुल गांधींना चॅलेंज; लोकसभेत जोरदार घमासान...

जी कारवाई करण्यात आली आहे. त्याची विस्तृत माहिती यादी प्रसार माध्यमांना देण्यात आली आहे.पुणे पोलिसांच्या भूमिकेवर संशय घेण्याचं काही कारण नाही. माध्यमांना व इतर व्यक्तींना पोलिसांनी फोटो दिले असा आरोप करण्यात येत आहे. त्यातलं ही तथ्य नाही.

पोलिसांनी कुठल्याही प्रकाराची फोटो व्हिडिओ पोलिसांकडून देण्यात आले नाहीत. लोक कोणी फोटोग्राफ किंवा व्हिडिओग्राफ काढत असतील तर त्यावर बंधन आम्ही घालू शकत नाही. कारवाई इन्फॉर्मेशन बेस्ट होती आम्हाला गुप्त माहिती मिळाली होती आणि आम्ही कारवाई केली या कारवाईबाबत कुणीही मनात शंका घेऊ नका. कुणीही संशय घेऊ नका आम्ही कुठल्याही प्रकारचा फोटो लीक केला नाही. कोणताही व्हिडिओ किंवा इमेजेस पोलिसांकडून लिक करण्यात आले नाहीत, असं सांगत खडसे यांचे सर्व दावे फोल असल्याचे सांगितले.

Amitesh Kumar On Eknath khadse .jpg
Parinay Fuke taunt Nana Patole : 'नाना पटोले, तुम्ही बॅलेटवरही हरला, आता ग्राम पंचायतीकडे लक्ष द्या'; आमदार फुकेंनी टायमिंग साधलं

...याला रेव्ह पार्टी म्हणता का?

विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेत याप्रकरणी पोलिस तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ते म्हणाले, ज्या ठिकाणी संगीत नाही, गोंधळ किंवा आदळआपट नाही. डान्स नाही. एका घरात सातजण बसले आहेत, आणि त्यांची पार्टी सुरु आहे. याला रेव्ह पार्टी म्हणता का? रेव्ह पार्टीची नेमकी व्याख्या काय? याला जर रेव्ह पार्टी म्हणत असतील तर महाराष्ट्रात प्रत्येक घरात असे पाच-सहा जण पार्टी करायला बसले तर त्यालाही रेव्ह पार्टी म्हणावं लागेल असं खडसे म्हणाले.

ते म्हणाले, पोलिसांनी रेव्ह पार्टीची व्याख्या सांगावी. या प्रकरणाला जाणीवपूर्वक रेव्ह पार्टी असं म्हणून बदनाम करण्याचं प्रयोजन काय? पोलिसांना काय अधिकार आहे की कुणाच्या व्यक्तिगत आयुष्यातील व्हिडीओ, फोटो सार्वजनिक करावे. पोलिसांनी ते मीडियाला दिले. पोलिसांनी हे निव्वळ बदनामी करण्यासाठी केलेलं कृत्य आहे. पोलिसांना चेहरे दाखवण्याचा अधिकार नाही, महिलांचे तर अजिबातच नाही. परंतु, या प्रकरणात पोलिसांनी महिलांचे व पुरुषांचे फोटो दाखवले. पोलिसांनी बदनामी करण्याचे सूत्र यामागे ठेवलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com