Pooja Ravetkar News : शिंदे अन् नानांचा वाद जेवणावरून; पूजा रावेतकरांची डोकेदुखी 'व्हायरल' फोटोवरून

Lok Sabha Election Latest Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नाना यांच्या जेवणावरून राजकीय नाट्य घडत असले तरी. या घडामोडीत मात्र, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या माजी शहरप्रमुख पूजा रावेतकरांची चांगलीच पंचाईत झाली आहे.
Pooja Ravetkar
Pooja RavetkarSarkarnama

Pune Loksabha Election : मुख्यमंत्र्यांच्या जेवणासाठी घरी शाही तयारी करूनही ते न आल्याने संतापलेले शिवसेनेचे (शिंदे गट) शहरप्रमुख नाना भानगिरे ( Nana Bhngire ) थेट पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची शक्यात वर्तविण्यात येत आहे. तशी चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात आणि पर्यायाने मीडियातही होऊ लागली आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत नाना नाराज झाल्याची चर्चा झडत असतानाच ते 'नॉट रिचेबल' झाले आहेत. त्यामुळे खरोखरीच नानांचा 'मूड' काय आहे, हे कळायला मार्ग नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) आणि नाना यांच्या जेवणावरून राजकीय नाट्य घडत असले तरी; या घडामोडीत मात्र, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या माजी शहरप्रमुख पूजा रावेतकरांची ( Pooja Ravetkar ) चांगलीच पंचाईत झाली आहे.

नानांच्या नाराजीवरून झालेल्या मीडिया आणि सोशल मीडियातील चर्चेत मात्र, मुख्यमंत्र्यांसोबत पूजा रावेतकरांचा फोटो व्हायरल होत आहे. मुख्यमंत्र्यांसाठी जेवण, नानांची नाराजी. त्यावरून पक्ष सोडण्याच्या चर्चा याचा काडीचा संबंध नाही. तरीही माझा फोटो वापरला जात असल्याचे गाऱ्हाणे पूजा रावेतकरांनी थेट बड्या नेत्यांच्या कानावर घातले. त्यामुळे जेवणावरून रंगललेले राजकीय वाद 'व्हायरल फोटो' वरून वाढण्याची शक्यता आहे. 'नाराजीनाट्यात माझा फोटो वापरून मला पक्षात बदनाम करण्याचा कट केला जात असल्याची तक्रार पूजा रावेतकरांनी शिवसेनेतील Shivsena नेत्यांकडे केली आहे. त्यावरून पक्षसंघटनेतील काहीजणांची झाडाझडतीही झाल्याचे बोलले जात आहे. एकूणच, या नाट्यात मुख्यमंत्री शिंदे Eknath Shinde प्रचारात आहेत, नाना 'नॉट रिचबेल' झाले आहेत आणि पूजा रावेतकर मात्र, चर्चेत आल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pooja Ravetkar
Supriya Sule News : 'डायनिंग टेबल-बंद खोलीतल्या गोष्टी काहीजण टीव्ही वर...'; सुळेंच्या निशाण्यावर फडणवीस!

शिवसेनेतील बंडापासूनच नाना भानगिरे ( Nana Bhangire ) हे मुख्यमंत्री शिंदेंच्या साथीला आहेत. शिंदेंनी पक्षावर ताबा ठोकताच नाना हे या शिवसेनेचे शहरप्रमुख झाले. त्यातून नाना हे शिंदेंच्या निकटर्वीय मानले गेले. राज्य सरकारपासून महापालिकेतून प्रचंड ताकद देऊन मुख्यमंत्र्यांनी पुण्यात नानांचा त्यांचा दबदबा वाढवला. त्याचा तेवढाच फायदा घेऊन नानाही कामांचा सपाटा लावला आहे. मुख्यमंत्री आणि नाना हे नवे समीकरण पुण्याच्या राजकारणात चर्चेत राहिले. मुख्यमंत्र्यांसाठी काय पण करण्याची नानांची तयारी असते. त्याच भावनेतून पुण्यात प्रचारासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांना नानांनी घरी जेवणासाठी बोलावले होते. आधी मुख्यमंत्री घरी येणार हे गृहीत धरून नानांनी जोरात तयारी केल्याचे सांगत येते. परिणामी, नाना समर्थकांतही उत्साह असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, सध्याच्या धावपळीमुळे मुख्यमंत्री काही नानांच्या घरी गेले नाहीत. त्यामुळे नाना नाराज झाल्याची चर्चा रंगली आणि ती ते पक्ष सोडणार असल्यापर्यंत गेली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना पुण्यात झटका बसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासाठी नाना समर्थकांचा मेळावाही भरणार आहे. या मेळाव्यात नाना काय भूमिका घेणार हे, कळेलच. मात्र, त्याआधी व्हायरल फोटोवरून पूजा रावेतकर सकाळपासून डोक्याला हात लावून बसल्याचे दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री हे खेड शिवापूरला आले होते. त्या भेटीत मुख्यमंत्र्यांचे स्वागत करतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यामुळे जेवणाचा वाद मागे पडेल समर्थकांतही उत्साह असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे जेवणाचा वाद मागे पडून शिवसेनेत आता मुख्यमंत्री शिंदे आणि पूजा रावेतकरांच्या फोटोवरून राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.

Pooja Ravetkar
Sushma Andhare : '...म्हणून चित्रा वाघांना पॉर्न फिल्ममधील पात्रांचा चांगला परिचय'; सुषमा अंधारेंचा पलटवार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com