Maharashtra Politic : शरद पवारांनी आवाहन करताच एकनाथ शिंदेंनी ऐकवलं,'घरात बसून...'

Eknath Shinde Sharad Pawar Marathwada Rain Affected : शरद पवार यांनी नुकसाग्रस्त भागाचा दौरा करू नका, असे आवाहन मंत्री, लोकप्रतिनिधींना केले होते. त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दौरा करणे कसे महत्त्वाचे आहे हे सांगितले आहे.
Eknath Shinde| Sharad Pawar
Eknath Shinde| Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde News : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पूरग्रस्त भागात मंत्री आणि लोकप्रतिनिधींच्या दौऱ्यांमुळे होणाऱ्या गर्दीमुळे सरकारी यंत्रणांचे लक्ष आपत्ती निवारण आणि नुकसान पंचनाम्यांऐवजी राजशिष्टाचार पूर्ण करण्याकडे वळले आहे. यामुळे पंचनाम्यांना विलंब होऊन मदतकार्य ठप्प होण्याचा धोका निर्माण झाला आहे, त्यामुळे हे दौरे थांबवावेत असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.पवारांच्या या आवाहनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले,'दौरे केल्याशिवाय नेमकी परिस्थिती काय आहे हे लोकप्रतिनिधींना कळत नाही. परिस्थिती जाणून घेण्यासाठी बांधावर जावं लागतं. बांधावर गेल्यानंतरच लोकांची खरी परिस्थिती कळते. लोकांचे अश्रू दिसतात, लोकांची व्यथा समजते त्यातूनच आपण किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय याबाबतचा अंदाज लावू शकतो.'

पुढे बोलताना ते म्हणाले, 'सध्याची परिस्थिती ही राजकारणात करण्याची नसून शेतकऱ्यांना मदत करण्याचे आहेत. त्यामुळे या परिस्थितीमध्ये कोणीही राजकारण करू नये. सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असून शेतकऱ्यांची पूर्णपणे मदत करणार असल्याचे'

मराठवाड्यात जास्त नुकसान

पावसामुळे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. मराठवाड्यातील नुकसानाचे प्रमाण जास्तमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माझ्यासह अनेक मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन स्वतःच्या डोळ्यांनी नुकसानाची पाहणी केली आहे. या संकटाच्या परिस्थितीमध्ये सरकार शेतकऱ्यांच्या मागे उभा आहे.

Eknath Shinde| Sharad Pawar
Raju Khare : शिंदेसेनेच्या व्यासपीठावर हजेरी लावणाऱ्या राजू खरेंवर कारवाई करणार का? राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याने घेतली रोखठोक भूमिका

शेतकरी हिताचे निर्णय घेऊ...

शेतकरी आणि माय माऊलीच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे जबाबदारी सरकारची असून ती जबाबदारी सरकार नक्कीच पार पाडेल. ही जबाबदारी पार पाडताना काही अति शर्टी शिथिल करून, बाजूला ठेवून शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय हे सरकार घेईल.केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मदत करण्यात येईल या संदर्भात केंद्राशी देखील चर्चा करण्यात आली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर असताना त्यांच्याशी मुख्यमंत्री आणि मी याबाबत बोललो आहे. जेव्हा जेव्हा या पद्धतीचे मोठे संकट येतात तेव्हा केंद्र सरकार हे मदतीला धावून येत असतं. त्यामुळे यावेळी देखील केंद्राकडून आपल्याला मदत मिळेल असे देखील एकनाथ शिंदे म्हणाले.

Eknath Shinde| Sharad Pawar
Sunil Kedar controversy: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला भीती काँग्रेसपेक्षा सुनील केदारांची

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com