

Pune News : महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. असं असताना देखील पुण्यामध्ये कोणत्याही पक्षाकडून अद्याप उमेदवारी यादी जाहीर करण्यात आलेली नाही. भाजपकडून रविवारी सायंकाळी उमेदवारी यादी जाहीर होणं अपेक्षित होतं. मात्र यादी जाहीर करण्यापेक्षा भाजपकडून थेट उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.
भाजपचा उमेदवारांची यादी जाहीर करण्यावरून तारखांचा लपंडाव गेले काही दिवस सुरू होता. मात्र आता उमेदवारी दाखल करण्यासाठी काही तास उरले असताना देखील अद्याप उमेदवारी यादी जाहीर केलेली नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवारांचा जीव टांगणीला लागला असताना भाजपकडून उमेदवारी यादी जाहीर केली जाणार नसल्याचे समोर आले आहे.
भाजपकडून ज्यांची उमेदवारी फिक्स झाली आहे, अशांना थेट फोन करून अर्ज भरण्याचा निरोप दिला जात आहे. त्यांना पक्षातर्फे ए, बी फॉर्मही पोहोचवले जात आहेत. बंडखोरी टाळण्यासाठी भाजपने ही खेळी खेळली आहे. आतापर्यंत गणेश बिडकर, स्वरदा बापट, कुणाल टिळक, श्रीनाथ भिमाले यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांनाही भाजपने एबी फॉर्म दिला आहे.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भाजपची उमेदवार यादी २६ डिसेंबरला जाहीर होईल, असे सांगितले होते. नंतर २८ डिसेंबरच्या रात्री उशिरापर्यंत यादी प्रसिद्ध होईल, अशी माहिती देण्यात आली होती.
मात्र, आता अधिकृत यादी जाहीर न करता, उमेदवारी निश्चित झालेल्यांना पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडून फोन केले जात आहेत. आज उमेदवारांना पक्षातर्फे गुप्तपणे ए आणि बी फॉर्म दिले जात आहेत. यामुळे नेमकी उमेदवारी कोणाला मिळाली, याबाबत संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.
भाजप मधून पहिला अधिकृत अर्ज गणेश बिडकर यांनी दाखल केला आहे. त्यासोबत सायली वांजळे, माधुरी सहस्त्रबुद्धे, योगेश मुळीक यांनी देखील देखील अर्ज दाखल केले आहेत. तसेच काही नेत्यांना पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आले असून काही नावे समोर आले आहे. मात्र या नावाची अधिकृत घोषणा मात्र झालेली नाही.
यांना एबी फॉर्म मिळाल्याची चर्चा?
स्वरदा बापट, कुणाल टिळक, बापू मानकर, राघवेंद्र मानकर, गणेश बिडकर, कल्पना बहिरट, देवेंद्र उर्फ छोटू वडके, उज्वला गणेश यादव, विशाल धनवडे, प्राजक्ता गडाळे, पल्लवी जावळे, श्रीनाथ भिमाले, राजेंद्र शिळीमकर, योगेश मुळीक, सायली वांजळे, अर्चना पाटील, शंतनू कांबळे, सम्राट थोरात, सुजाता काकडे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.