MNS and Loksabha Election : मनसे 'या' कारणामुळे आठवडाभरानंतरही महायुतीच्या प्रचारात सामील नाही!

MNS News : आगामी दोन दिवसांत मनसे महायुतीच्या प्रचारात उतरणार असल्याची माहिती आली समोर
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama

Loksabha Election 2024 : शिवाजी पार्क, दादर (पश्चिम), मुंबई येथील गुढीपाडवा मेळाव्यात (ता.9) `मनसे`अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेला महायुतीला पाठिंबा जाहीर केला. त्याला आठवडा उलटून गेला. मात्र, मनसे ही महायुतीच्या प्रचारात अद्याप उतरलेली नाही. त्यामागे एकच कारण असल्याचे आता समोर आले आहे.

मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार (शिंदे शिवसेना) श्रीरंग बारणे यांची पहिली पत्रकार परिषद पिंपरीत सोमवारी झाली. त्यावेळी मागे लावलेल्या बॅनरवर मनसेच्या इंजिनसह महायुतीतील सहाही पक्षांची निवडणूक चिन्हे होती. तरीही या परिषदेकडे मनसेने पाठ फिरवली. युतीतील इतर पक्षांचे नेते, प्रतिनिधी आणि आमदार उपस्थित असताना मनसेचे, मात्र नेते वा इतर पदाधिकारी कोणीही या वेळी हजर नव्हते, त्यामुळे त्याची चर्चा झाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Raj Thackeray
Srirang Barane vs Sanjog Waghere: 'सगळे 25 लाख मतदार माझे नातेवाईक' म्हणत बारणेंचा प्रतिस्पर्धी वाघेरेंना टोला!

अखेर, येत्या दोन दिवसांत मनसेही महायुतीच्या प्रचारात उतरणार असल्याचे मंगळवारी (ता.16) समजले. त्याबाबत तयारीच्या बैठका सुरू आहेत, असे मनसेचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष सचिन चिखले (Sachin Chikale) यांनी 'सरकारनामा'ला सांगितले. लोकसभा मतदारसंघनिहाय राज ठाकरे (Raj Thackeray) हे मनसेचे समन्वयक नेमणार आहेत. तेच अद्याप नेमले गेलेले नाहीत, या कारणामुळेच पाठिंबा जाहीर करूनही मनसे महायुतीच्या प्रचारात आठवडा झाला तरी उतरलेली नाही.

या नियुक्त्या दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच मनसे ही महायुतीच्या प्रचारात दिसणार आहे. मनसेच्या दसरा मेळाव्यात ठाकरे यांनी या समन्वयकांची घोषणा केली होती. मात्र, त्यांच्या नियुक्त्या रखडल्याने महायुतीतील मनसेचा सहभागही रखडला आहे.

Raj Thackeray
Mahavikas Aghadi : सुळे, कोल्हे अन् धंगेकर एकाचवेळी उमेदवारी अर्ज दाखल करणार; पुण्यात महाविकास आघाडीचे शक्तिप्रदर्शन!

दरम्यान, आदेश आल्याशिवाय कोणीही लगेच महायुतीच्या प्रचारात उतरू नये, त्यांच्या सभांना जाऊ नये, असे सोमवारच्या पुण्यातील मनसेच्या बैठकीत सांगण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस गणेश सातपुते (Ganesh Satpute) यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. त्याला जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघांतील पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, मावळ लोकसभेचे मनसेचे समन्वयक म्हणून चिखले यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. त्यांनीच त्याला दुजोरा दिला. इतर लोकसभा मतदारसंघांतही पक्षाच्या स्थानिक अध्यक्षांकडे ही जबाबदारी देण्यात येणार असल्याचे समजते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com