Mahavikas Aghadi : सुळे, कोल्हे अन् धंगेकर एकाचवेळी उमेदवारी अर्ज दाखल करणार; पुण्यात महाविकास आघाडीचे शक्तिप्रदर्शन!

Sule, Kolhe, Dhangekar : जाणून घ्या कोणती तारीख निश्चित केली आहे? पुण्यात महाविकास आघाडीची भव्य सभा होणार आहे.
Sule, Kolhe and Dhangekar
Sule, Kolhe and DhangekarSarkarnama

Pune political News : महाविकास आघाडीचे उमेदवार बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सुप्रिया सुळे, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे डॉ. अमोल कोल्हे व पुणे लोकसभा मतदारसंघाचे रवींद्र धंगेकर हे तीनही उमेदवार गुरुवार 18 एप्रिल आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याप्रसंगी महाविकास आघाडीच्यावतीने भव्य शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे.

18 एप्रिल 2024 रोजी सकाळी साडेदहा वाजता विभागीय आयुक्त कार्यालय तथा जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुप्रिया सुळे(Supriya Sule), डॉ.अमोल कोल्हे, रविंद्र धंगेकर हे महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sule, Kolhe and Dhangekar
Maval Lok Sabha Constituency : रावणाची उपमा देत श्रीरंग बारणेंवर निशाणा; संजोग वाघेरे नेमके काय म्हणाले?

यानंतर रास्ता पेठेतील हॉटेल शांताई समोर महाविकास आघाडीची भव्य सभा होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार(Sharad Pawar), प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अजित फटके हे दिग्गज नेते पुण्यातून विजयाचे रणशिंग फुंकणार आहेत.

दरम्यान, बारामतीत राज्यातील सर्वांत ‘हाय व्होल्टेज’ लढत रंगलेली आहे. नणंद-भावजयीच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. महाविकास आघाडीकडून खासदार सुप्रिया सुळे, तर महायुतीकडून सुनेत्रा पवार या निवडणूक लढवत आहेत. अत्यंत प्रतिष्ठेच्या या लढतीसाठी पवार आणि सुळे या दोघी येत्या गुरुवारी (ता. 18 एप्रिल) आपला उमेदवारी अर्ज पुण्यात भरणार आहेत.

Sule, Kolhe and Dhangekar
Sunetra Pawar : शरद पवार, अजितदादांच्या समर्थकांसाठी 'गुड न्यूज'; पण इलेक्शननंतर...

उमेदवारी अर्ज भरताना दोन्ही उमेदवारांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. महायुतीच्या बारामतीसोबतच पुणे आणि शिरूर या मतदारसंघाचे उमेदवारही अनुक्रमे माजी महापौर मुरलीधर मोहोळ(Muralidhar Mohol) आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हेही आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती समोर आली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com