NCP Sharad Pawar: पक्ष व चिन्ह गेल्यानंतरही शरद पवार राष्ट्रवादीतली गटबाजी काही संपेना

Protest Of NCP Sharad Pawar Group : निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह दिले.
NCP Sharad Pawar
NCP Sharad Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Pimpri Chinchwad News : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व घड्याळ हे त्यांचे निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी (ता.6) दिला. त्यानंतर पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा शरद पवार युवक राष्ट्रवादीने त्याविरोधात निकालाच्या दिवशीच जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.

तर, फादर बॉडी शहर राष्ट्रवादीने बुधवारी (ता.7) सायंकाळी निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला. पण दोन वेगवेगळे आंंदोलनांमुळे आधीच संकटात सापडलेल्या शरद पवार गटातली गटबाजी असल्याचे पुन्हा समोर आले आहे.

निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह दिले. या निर्णयानंतर अजित पवार गटात जल्लोष साजरा केला जात आहे, तर पुढील रणनीती आखण्यासाठी शरद पवार गटाने हालचाली सुरू केल्याचे दिसत आहे.

विधिमंडळातील बहुमत लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना (Ajit Pawar) दिले आहे, तर आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गटाला नवीन नाव देण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. निवडणूक आयोगाने 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार' या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. हे नाव 27 फेब्रुवारीपर्यंत वैध राहणार आहे. 

NCP Sharad Pawar
Balasaheb Patil : बाळासाहेब पाटलांचा गंभीर आरोप; म्हणाले, 'कोणाच्या तरी दबावाखाली निवडणूक आयोगाने...'

निवडणूक आयोगाच्या (Election Commission) पक्ष व चिन्हाच्या निर्णयाविरोधात शरद पवार युवक राष्ट्रवादीने कालच सायंकाळी पिंपरी चौकात निषेध केला. त्यावेळी कामठे व इतर त्यांचे समर्थक पदाधिकारी हजर नव्हते.तर, कालच्या आयोगाच्या निर्णयाविरोधात शहर राष्ट्रवादीने बुधवारी सायंकाळी पिंपरी चौकातच आंदोलन केले.

यावेळी काही कार्यकर्त्यांनी मुंडन करून निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचा निषेध केला. त्याकडे युवक राष्ट्रवादीने पाठ फिरवली. आंदोलकांनी काळे कपडे घातले होते. दरम्यान, एकाच पक्षाच्या दोन गटाच्या दोन दिवसांत झालेल्या दोन स्वतंत्र आंदोलनाची चर्चा नंतर शहरात रंगली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

फादर बॉडी आणि त्यातही शहराध्यक्ष तुषार कामठे आणि एकूणच शहर युवक राष्ट्रवादीत मतभेद असल्याचे यापूर्वीच दिसून आले आहे. त्यातून शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शहर युवकने आय़ोजित केलेल्या आणि प्रदेश युवक अध्यक्ष मेहबूब शेख यांची उपस्थिती असलेल्या शरद पवार क्रीडा महोत्सवाकडे कामठे व त्यांच्या समर्थक पदाधिकाऱ्यांनी गेल्या महिन्यात पाठ फिरवली होती. या गटबाजीला कंटाळून राजन नायर या पदाधिकाऱ्याने पक्षाला सोडचिठ्ठी देत गेल्याच महिन्यात अजित पवार गटात घरवापसी केली होती. ती गटबाजी व मतभेद हे काल व आज पुन्हा समोर आले.

(Edited By Deepak Kulkarni)

NCP Sharad Pawar
Jitendra Awhad News : 'तुम्ही हातातलं घड्याळ चोरलं, पण मनगट आमच्याकडेच' ; आव्हाडांकडून अजित पवार लक्ष्य!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com