
Shishir Shinde join Shinde group : शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शिशिर शिंदे यांनी आपल्या रविवारी (१८ जून) पदाचा राजीनामा दिला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनाम्याचे पत्र देत त्यांनी खंतही व्यक्त केली. शिवसेनेत (ठाकरे गटात) मला मनासारखं काम मिळत नाही, म्हणून मी राजीनामा देत असल्याचं कारण शिशिर शिंदे यांनी आपल्या पत्रात सांगितलं.
अशी आहे शिशिर शिंदेंची कारकिर्द
शिशिर शिंदे यांनी शिवसेनेतून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. १९९२ ला ते शिवसेनेचे मुलूंचे नगरसेवक झाले. शिवसेनेकडून त्यांना उपनेतेपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यांनी शिवसेनेची अनेक आंदोलने गाजवली. बाळासाहेब ठाकरेंच्या एका आदेशाने पाकविरुद्धच्या सामन्यापूर्वी शिशीर शिंदेंनी 1991 मध्ये वानखेडे मैदानाची खेळपट्टी उखडली होती. 1996 ते 2002 या काळात ते विधानपरिषदेचे सदस्य होते. (Shishir Shinde leave Uddhav Thackeray Group)
पण 2006 मध्ये त्यांनी शिवसेनेला (Shivsena) रामराम ठोकला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. 2009 मध्ये त्यांनी मनसेकडून लोकसभेची निवडणूक लढवली. पण त्यांचा पराभव झाला. पण त्याचवर्षी शिशीर शिंदे यांनी विधानसभा निवडणूक लढवली आणि त्यात विजयी झाले.
पण विधानसभा सभागृहात शपथविधीपूर्वीच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मुंबई आणि नागपूर विधानसभेतून त्यांना चार वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं. याचं कारण होतं सपा आमदार अबू आझमी यांना केलेली मारहाण. शिशिर शिंदे यांच्यासह मनसे आमदारांनी अबू आझमी यांच्या हिंदीतील शपथेला विरोध करत त्यांच्यावर सभागृहातच हल्ला केला. या प्रकरणी शिशीर शिंदेंना निलंबित करण्यात आलं.त्यानंतर 2009 मध्ये त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात आली. (Maharashtra Politics)
शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केलेल्या शिशिर शिंदे यांनी 2006 मध्ये त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकला आणि मनसेत प्रवेश केला. १२ वर्षे त्यांनी मनसेत अनेक पदांवर कामं केली. पण मुंबई महापालिका निवडणुकीच्या व्यूहरचनेपासून लांब ठेवल्यामुळे नाराज झालेल्या शिंदेंनी ‘आपल्याला नेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा’, अशी विनंती करणारे पत्र मुंबई महापालिका मतदानाच्या दिवशी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरेंकडे सुपूर्द केले. त्यानंतर त्यांनी २०१८ मध्ये त्यांनी पुन्हा ठाकरे गटात प्रवेश केला. गेल्या सहा वर्षापासून ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत होते.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.