FRP Payment : खूश खबर! एफआरपी एकरकमी देण्याचे सूत्र 'माळेगाव'ने स्वीकारले, प्रतिटन 3132 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर

Malegaon Sahakari Sakhar Karkhana FRP Payment : माळेगाव (ता.बारामती) सहकारी साखर कारखान्याने 1 ते 15 मार्चच्या कालावधीत गाळप झालेल्या उसाचे पमेंट प्रतिटन 3132 रुपये एकरकमी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग केले.
FRP Decision
FRP Decisionsarkarnama
Published on
Updated on

कल्याण पाचांगणे

FRP Payment News : 1 ते 15 मार्च`च्या कालावधीत गाळप झालेल्या उसाचे पमेंट माळेगाव कारखाना प्रशासनाने प्रतिटन 3132 रुपये एकरकमी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केले. 3132 ही रक्कम एफआरपी (एकरकमी रास्त व किफायतशीर दर) पेक्षा अधिकची आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून एफआरपी एकरकमी देण्याबाबतचा केलेला आदेश महाराष्ट्रात सर्वप्रथम माळेगावने स्वीकारला. परिणामी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उपमुख्यमंत्री अजित पवार नेतृत्व करीत असलेल्या माळेगावच्या संचालक मंडळाचे अभिनंदन केल्याचे सांगण्यात आले.

महाराष्ट्रात ऊस उत्पादक शेतकर्‍यांना एकरकमी एफआरपी देण्याचे आदेश सोमवार (ता.17) रोजी मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. तसेच दोन टप्प्यांत एफआरपी देण्याचा 21 फेब्रूवारी 2022 रोजीचा राज्य सरकारने काढलेला शासन आदेशही न्यायालयाने रद्द केला होता. त्या पार्श्वभूमीवर माळेगाव (ता.बारामती) सहकारी साखर कारखान्याने 1 ते 15 मार्चच्या कालावधीत गाळप झालेल्या उसाचे पमेंट प्रतिटन 3132 रुपये एकरकमी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग केले.

FRP Decision
Prashant Kortkar Arrested : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला अटक, 'या' राज्यात बसला होता लपून

अर्थात महाराष्ट्रात एफआरपी एकरकमी देण्याचे सूत्र सर्वप्रथम माळेगावने स्वीकारले आहे, असा दावा अध्यक्ष अ‍ॅड. केशवराव जगताप, उपाध्यक्ष राजेंद्र ढवाण आदी संचालकांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषदेमध्ये केला. यावेळी संचालक तानाजी देवकाते, मंगेश जगताप, मदनराव देवकाते, सागर जाधव, संजय काटे, दत्तात्रेय येळे, पंकज भोसले, बन्शीलाल आटोळे, निशिगंध निकम, कार्यकारी संचालक अशोक पाटील, वित्त विभाग प्रमुख सत्यवान जगताप उपस्थित होते.

अध्यक्ष अ‍ॅड. जगताप म्हणाले,'माळेगाव'ने २३४ रुपये प्रतिटन उत्पादन खर्च कमी करीत सभासदांना राज्यात प्रथम क्रमांकाचा गतवर्षी 3636 अंतिम ऊस दर दिला. चालू हंगामातही प्रतिटन 3132 रुपये सर्वाधिक अ‍ॅडव्हास (एफआरपीपेक्षा अधिक) शेतकऱ्यांना दिला. जून ते जुलैमध्ये खोडकी पेमेंट प्रतिटन 200 रुपये देण्याचे नियोजन केले.

साखर कामगारांना आजवर विक्रमी बोनस व रजेचा पगार दिला. हुद्देवारी दिली. शासनस्तरावर निश्चित होणारी कामगारांची वेतन वाढ विचारात घेवून अर्थिक नियोजन केले. मागील संचालक मंडळाने घेतलेल्या मध्यम मुदत कर्जाची परत फेड पाच वर्षात 96 कोटी 60 लाख रुपये केली. 85 कोटींची भांडवली गुंतवणूक केली. परिणामी व्हीएसआय संस्थेने अजितदादा नेतृत्व करीत असलेल्या माळेगावला उत्कृष्ट अर्थिक नियोजनाचा राज्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार दिला. अशी उत्तम अर्थिक स्थिती असताना विरोधक माळेगावची बदनामी करतात.

माळेगावच्या ऊस गळीताची सांगता...

माळेगाव कारखान्याचा यंदाचा गळीत हंगाम 130 दिवसांचा ठरला. या कालावधीत सुमारे 11 लाख 25 हजार टन ऊसाचे गाळप करण्यात यश आले. त्यापैकी गेटकेनधारकांनी 3 लाख 36 हजार 824 टन ऊस देऊन माळेगावर विश्वास दाखविला. त्यामध्ये 11 लाख 81 हजार 700 साखर पोती (अद्याप प्रोसेस चालू ) निर्माण झाली आहेत. 8 कोटी 54 लाख युनिट विजेचे उत्पादन झाले. तर इथेनाॅलचेही विक्रमी उत्पन्न यंदाच्या हंगामात मिळाले.

FRP Decision
Lok Sabha Election: लोकसभेनंतर 6 पक्ष झाले मालामाल! निधीसंकलनात कोणी मारली बाजी; काँग्रेस कितव्या क्रमांकावर?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com