Manorama Khedkar: मनोरमा खेडकरांवर पुण्यात गुन्हा दाखल! अपहरण प्रकरणात आणखी एक खळबळजनक खुलासा

Manorama Khedkar FIR: नवी मुंबईत एका ट्रकच्या क्लिनरच्या अपहरण प्रकरणी पुणे शहर पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Pooja Khedkar, Manorama Khedkar
Pooja Khedkar, Manorama KhedkarSarkarnama
Published on
Updated on

Manorama Khedkar FIR: नवी मुंबईत एका ट्रकच्या क्लिनरच्या अपहरण प्रकरणी पुणे शहर पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मनोरमा या वादग्रस्त माजी आयएएस अधिकारी पुजा खेडकर हिच्या आई आहेत. चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच या प्रकरणात नवी खळबळजनक माहिती समोर आली आहे.

पुणे शहर पोलिसांनी माजी आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडेकर यांच्याविरुद्ध चतुर्श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर बीएनएसच्या कलम २२१, २३८ आणि २६३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबईतील रस्त्यावर ट्रक आणि कारच्या धक्का लागल्याच्या घटनेवरून हे प्रकरण समोर आलं आहे. ट्रकनं घासलेल्या कारमधील दोन व्यक्तींनी संबंधित ट्रक चालकाच्या मदतनीसाचं अर्थात क्लिनरचं प्रल्हाद कुमार याचं अपहरण करून त्याला मनोरमा खेडेकर यांच्या घरी आणल्याचा आरोप आहे.

Pooja Khedkar, Manorama Khedkar
Kolhapur World Record: कोल्हापूरात घडला विश्वविक्रम! संविधान प्रास्ताविकेचं तब्बल 19 भाषांमध्ये गायन; कसा होता सोहळा?

दरम्यान, याप्रकरणातील खळबळजनक बातमी म्हणजे, ट्रकचा क्लिनर प्रल्हाद कुमार याच्या अपहरणामध्ये पूजा खेडकरचे वडील आणि मनोरमा खेडकर यांचे पती दिलीप खेडकर यांचाही समावेश असल्याचं समोर आलं आहे. तपासादरम्यान, नवी मुंबई पोलिसांनी अपहरणकर्त्या व्यक्तीला ज्या ठिकाणी नेण्यात आलं या ठिकाणाचा माग घेतला आणि ते थेट मनोरमा खेडकर यांच्या घरापर्यंत पोहोचले. पण, जेव्हा पोलीस पथकानं खेडकरांच्या घरात जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा मनोरमा खेडेकर यांनी त्यांना अडवलं आणि दिलीप खेडकर यांना पळून जाण्यास मदत केली. त्याचबरोबर पोलिसांवर मनोरमा खेडकर यांनी पोलिसांवर कुत्रेही सोडले. यावरुनच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी चतुश्रृंगी पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com