MVA in Chhatrapati Sambhajinagar : महाविकास आघाडीच्या सभेचा पहिला डाव; 'टीझर'मधे ठाकरे गटानेच खाल्ला भाव!

Uddhav Thackeray News : छत्रपती संभाजीनगर येथे २ एप्रिल रोजी महाविकास आघाडीची 'वज्रमूठ'
Ajit Pawar, Uddhav Thackeray, Nana Patole
Ajit Pawar, Uddhav Thackeray, Nana PatoleSarkarnama

Ajit Pawar and Nana Patole : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आले. त्यानंतर निवडणुक आयोगाने शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह शिवसेनेतून बाहेर पडलेल्या शिंदे गटास दिले. त्यानंतर निवडणूक आयोग केंद्र सरकार इशाऱ्यानुसार काम करीत असल्याची टीका महाविकास आघाडीने केली. तसेच अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यांना नुकसानभरपाई देण्यास विलंब झाला. कांद्याचे दर घसरल्याने नाफेडच्या माध्यमातून खरेदीकडे झाली नाही. यासह कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शनची मागणी, एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि इतर प्रश्न घेऊन महाविकास आघाडी राज्यात आता ठिकठिकाणी सभा घेणार आहे.

Ajit Pawar, Uddhav Thackeray, Nana Patole
Pune Crime : लाखोंचे कर्ज फेडण्यासाठी त्याने रचला खंडणीचा डाव अन् वापरले मोहोळांचे नाव

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन काळातच या सभांचे महाविकास आघाडीने (MVA) नियोजन केले आहे. त्यानुसार पहिली सभा २ एप्रिल रोजी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे होत आहे. त्या सभेची जाबाबदारी शिवसेनेचे (ठाकरे गट Shivsena) नेते व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यांना मराठवाड्यातील महाविकास आघाडीच्या इतर पदाधिकाऱ्यांनी सहाकर्य करावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी यापूर्वीच केले होते. तसेच राज्यातील ठरलेल्या या सभा ऊन, वादळ, पाऊस आला तरी होणारच, असेही पवार यांनी सांगितले होते. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर येथील सभेची तयारी सुरू आहे.

Ajit Pawar, Uddhav Thackeray, Nana Patole
Solapur News : सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का; माजी खासदार पक्ष सोडणार

औरंगाबादचं नामकरण छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर येथे वज्रमूठ महाविकास आघाडीची विराट जाहीर पहिली सभा २ एप्रिल रोजी होत आहे. या सभेला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), अजित पवार आणि नाना पटोले संबोधित करणार आहेत. दरम्यान या सभेचा 'टीझर; आता प्रसिद्ध करण्यात आला आहे. तो ४५ सेकंदाचा आहे. त्यात उद्धव ठाकरे दोन वेळा, अजित पवार व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे एकदा बोलताना दिसतात.

शिवसेना पक्ष, धनुष्यबाण चोरला अशी टीका उद्धव ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर करतात. त्यानुसार ४० आमदार फुटले. शिवसेना (Shivsena), चिन्हही चोरले पण मूळ शिवसेनेवर, ठाकरेंवर प्रेम करणारी माणसं तुम्ही चोरु शकणार नाही, विश्वास उद्धव ठाकरे देतात. यानंतर आस्मानी आणि सुलतानी एकत्र आलेत, पण जिंकेपर्यंत लढायचे, असे आवाहनही ते करतात. तर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये महापुरुषांचा अवमान होऊ लागला, असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणतात. नाना पटोले (Nana Patole) हे महाराष्ट्रद्रोह्यांच्या विरोधात सर्वजण मिळून वज्रमूठ एक करण्याचे आवाहन करताना दिसतात. यामुळे या सभेत नेमकी काय टीका केली जाईल, याचा अंदाज येत आहे.

Ajit Pawar, Uddhav Thackeray, Nana Patole
Shinde-Fadnavis Press Conference : बोलण्याच्या भरात मुख्यमंत्री शिंदे महत्वाचे मुद्देच विसरले; अन् मग फडणवीसांनी केलं 'प्रॉम्पटिंग'

दरम्यान, ४५ सेकंदाच्या या 'टीझर'मधील जास्त वेळ शिवसेनेला दिल्याचे जाणवत आहे. यात बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray), मीनाताई ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे फोटो आहेत. तसेच लोकांच्या गर्दीत भगवा फडकताना दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर हा पहिल्यापासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे येथे ठाकरे गटाला मानणारा मोठा वर्ग आहे. त्याला पुन्हा आपल्याकडे आकर्षीत करण्यासाठीच उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. त्यामुळे 'टीझर'मध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरून सभेला येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com