G-20 परिषदांसाठी परदेशी पाहुणे पोहोचले पुण्यात, सरकारकडून खास 'वेलकम डिनर'!

G-20 : 100 हून अधिक पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
G-20 News, Aurangabad
G-20 News, AurangabadSarkarnama

G-20 summit : मागील महिन्याभरापासून करण्यात येणारी 'जी 20' परिषदेच्या तयारी आज रविवारी जवळपास पूर्ण झाली.पुण्यात पोहोचलेल्या विविध पाहुण्यांचे, परदेशी प्रतिनिधींचे स्वागत मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आले. केंद्र सरकारकडून पाहुण्यांसाठी विशेष "वेलकम डिनर' व्यवस्था करत त्यांच्या पाहुणचाराची खास काळजी घेतली. दरम्यान, विविध देशांच्या पाहुण्यांच्या सुरक्षेत कसलीही कसर राहू नये यासाठी शंभरपेक्षा अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला.

G-20 News, Aurangabad
IPS Vaibhav Nimbalkar : आयपीएस वैभव निंबाळकर यांना थेट 'डिआयजी'पदी बढती!

भारताच्या नेतृत्वात पहिल्यांदाच होणारी यंदाच्या "जी 20' परिषदामधील महत्वपूर्ण बैठक सोमवारी (ता.16) व मंगळवारी (ता.17) रोजी पुण्यात होत आहे. ही परिषद सुसूत्रबद्धतेने व्हावी, यासाठी पुणे पालिकेच्यावतीने गेल्या महिनाभरापासून स्वच्छता, शहराचे सुशोभिकरण, सादरीकरणाबरोबरच विविध टप्प्यांवर मोठ्या प्रमाणात काम केले जात होते.

दरम्यान, आता या परिषदांसाठी काल शनिवारपासूनच विविध देशांचे प्रतिनिधी, परदेशी पाहुणे पुणे शहरात पोहचण्यास सुरूवात झाली आहे. शनिवारी जवळपाश 20, आज रविवारी 40 पेक्षा जास्त प्रतिनिधी पुण्यात पोहचले आहेत. पुण्यातल्या लोहगाव विमानतळावर परदेशी पाहुण्यांचे पारंपरिक रितीने स्वागत करण्यात आले.

यानंतर ते सेनापती बापट रस्त्यावरील मेरीयॉट हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, राज्याच्या सरकाकडून परिषद होणाऱ्या ठिकाणी 5 स्टॉलची मांडणी केली गेली आहे. तर परदेशी पाहुण्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणाऱ्या वृक्षारोपणाची रंगीत तालीम रविवारी घेण्यात आली. यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांतून त्यांचे स्वागत करण्यात आले आहे.

G-20 News, Aurangabad
Pune MPSC Students Protest : पुण्यातील एमपीएससी'च्या विद्यार्थ्यांचं आंदोलन स्थगित, पण...

पाहुण्यांसाठी कडक सुरक्षा व्यवस्था :

'जी 20' परिषदेसाठी परदेशी पाहुण्यांची सुरक्षेत कसलीही कसर राहू नये. यासाठी पुणे पोलिसांकडून विशेष तयारी करण्यात येत आहेत. परिषदांटच्या ठिकाणी पोलिसांनी कसून तपासणी केली आहे. या ठिकाणी'मॉक ड्रिल'ही घेण्यात आले आहे. तसेच सोमवार व मंगळवार या दिवशी मेरीयॉट हॉटेलच्या परिसरात 100 ते 150 पोलिसांचा कडक पहारा करण्यात येईल.

स्वागतासाठी "शिवराज्याभिषेक सोहळा :

परदेशी पाहुणे व परिषदाचे प्रतिनिधी यांचे महापालिकेच्या प्रशासनाने खास सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले आहे. यामध्ये "शिवराज्याभिषेक सोहळा' या संकल्पनावर असेलेले कार्यक्रम सादर केले आहेत. याबरोबरच महाराष्ट्राची सांस्कृतिक लोकधारेचे दर्शन घडविणारे कार्यक्रमही सादर करण्यात येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com