Pune MPSC Students Protest : पुण्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC Examination) परीक्षेची तयारी करणारे शेकडो विद्यार्थी आज (१३ जानेवारी) रस्त्यावर उतरले होते. अखेर तब्बल १८ तासानंतर आज पहाटे पुण्यातलं एमपीएससीच आंदोलन स्थगित करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भेटीचं आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी हे आंदोलन स्थगित केलं.
मुख्यमंत्री शिंदे आज पुणे दौऱ्यावर आहे. यावेळी ते एमपीएससीच्या (MPSC) विद्यार्थ्यांमध्ये भेट होणार आहे. पाच विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ पुण्यात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वतीने काही मागण्या मांडण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी आज पुण्यात चर्चा झाल्यानंतर आंदोलनबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र आंदोलन स्थगित केलं म्हणजे स्वल्पविराम, पूर्णविराम नाही, अशी भावनाही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC Examination) परीक्षेची तयारी करणारे शेकडो विद्यार्थी आज (१३ जानेवारी) रस्त्यावर उतरले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) गेल्या वर्षी अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतला होता.
२०२३ पासून एमपीएससीच्या परीक्षाही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) धर्तीवर एमपीएससीच्या परीक्षा होणार आहेत. पण हा अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीतील हा बदल २०२५ पासून लागू करण्यात यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. तसेच, या अभ्यासक्रमाची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, म्हणून अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीत बदल २०२५ पासून लागू करण्याची मागणी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.