Pune News: कळमोडी धरणातील पाणी मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे उपोषण; आढळराव पाटलांनी दिलं मोठं आश्वासन

Shivajirao Adhalrao Patil: शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेतली.
Shivajirao Adhalrao Patil
Shivajirao Adhalrao PatilSarkarnama

मंचर : मुंबई येथे आझाद मैदानावर कळमोडी धरणातील पाणी सातगाव पठारासह (ता.आंबेगाव) शिरूर व खेड कोरडवाहू गावांना मिळावे, या मागणीसाठी पुणे जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे माजी गटनेते देविदास दरेकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवार (ता.२६) पासून शेतकरी उपोषणाला बसले आहेत.

या उपोषणाला माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मंगळवारी (ता.२७) भेट दिली. यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांबरोबर चर्चा करून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

Shivajirao Adhalrao Patil
Sunil Kendrekar News : केंद्रेकरांनी दोन वर्षापुर्वीच दिले होते स्वेच्छा निवृत्तीचे संकेत..

यावेळी आढळराव पाटील म्हणाले, "कळमोडी धरणातील पाणी सातगाव पठार (ता.आंबेगाव) परिसरातील शेतीला मिळावे. हा प्रश्न तातडीने सुटावा, यासाठी शेतकरी बांधवांना सोबत घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे ", असं ते म्हणाले.

Shivajirao Adhalrao Patil
Rahul Shevale Defamation Case: ठाकरे, राऊतांची डोकेदुखी वाढणार ? खासदार शेवाळेंच्या मानहानी प्रकरणी न्यायालयाने दिले 'हे' मोठे निर्देश

"खेड, आंबेगाव व शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या कळमोडी प्रकल्पाला गती मिळावी यासाठी, डिंभे धरणातून बोगद्याद्वारे पाणी थेट नगर जिल्ह्यात नेण्याचा घाट घालणाऱ्या प्रवृत्तींना रोखण्यासाठी उपोषण सुरु आहे", असं पुणे जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे माजी गटनेते देविदास दरेकर यांनी सांगितलं. तर शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन यावेळी आढळराव पाटील यांनी दिलं.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com