फडणवीसांच्या दौऱ्यात भाजपने केली फिट्टंमफाट; राष्ट्रवादीला दिला मोठा धक्का

पिंपरी-चिंचवड (Devendra Fadnavis) महापालिका निवडणूक जवळ आल्याने शहरात राजकीय पक्षांत इनकमिंग,आऊटगोईंग सुरु झाले आहे.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavissarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिका निवडणूक जवळ आल्याने शहरात राजकीय पक्षांत इनकमिंग,आऊटगोईंग सुरु झाले आहे. गेल्या पंधरा दिवसांत पालिकेतील सत्ताधारी भाजपच्या (BJP) चार नगरसेवकांनी राजीनामे दिले, तर एकाने काल (ता.५) पक्षच सोडला. पाचापैकी एकाने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला. बाकीचेही त्याच मार्गावर आहेत. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या शहर भेटीत राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका शोभा आदियाल यांना आज (ता.६) प्रवेश देत भाजपने थोडी का होईना फिट्टंमफाट केली.

Devendra Fadnavis
राज्यपाल म्हणाले; मुरली इधर आओ, प्रधानमंत्री बुला रहे है !

आदियाल आणि त्यांचा मुलगा अमर यानेही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शोभा आदियाल यांनी सुदर्शननगर, पिंपळेगुरव भागाचे २००७ ते १२ मध्ये प्रतिनिधीत्व केले आहे. २०१७ च्या निवडणुकीत त्या पराभूत झाल्या होत्या. त्यांनी विकासकामांच्या उद्घाटनासाठी शहरात आलेल्या फडणवीसांच्या उपस्थितीत पिंपळे निलख येथे भाजपमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी घडवून आणत पिंपळेगुरव भागात राष्ट्रवादीला धक्का दिल्याचे मानले जात आहे.

Devendra Fadnavis
पिंपरीत फडणवीसांच्या ताफ्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फेकल्या चपला आणि बांगड्या

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज (ता. 6 मार्च) पिंपरी-चिंचवड येथील विविध विकासकामांचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमस्थळी राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता. यावेळी फडणवीस यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर चपला आणि बांगड्या फेकण्याची घटना घडली. भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली. यामुळे पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आंदोलकांवर लाठचार्ज केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com