
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या गारगोटी जिल्हा परिषद मतदारसंघात राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत.
भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई काँग्रेसमध्ये गेल्याने आबिटकरांना कडवे आव्हान निर्माण झाले आहे.
त्याचबरोबर महायुतीही मैदानात उतरणार असल्याने त्रिकोणी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे.
Kolhapur News : पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे होम पीच असणाऱ्या गारगोटी जिल्हा परिषद मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कारण भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई लोकसभेच्या तोंडावर काँग्रेसमध्ये गेल्याने कडवे आव्हान निर्माण झाले आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही महिलेसाठी राखीव झाल्याने या मतदारसंघात हायहोल्टेज लढत होणार आहे. पालकमंत्री आबिटकर यांना मतदारसंघाच्या इतिहासात पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रिपदी मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने मंत्री आबिटकर यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
आरक्षण सोडतीत सर्वसाधारण पुरुष आरक्षण पडेल व आपल्याला संधी मिळेल, अशी अशा होती. मात्र सर्वसाधारण झाल्याने नेते व त्यांच्या वारसदारांची आरक्षणामुळे निराशा झाली आहे. महिला आरक्षण पडल्याने नेत्यांची व त्यांच्या कुटुंबीयांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. नेत्यांच्या वारसदार महिलाच यात उतरतील, असे सध्या तरी चित्र आहे. अरविंद सुतार, गारगोटी पालकमंत्री आबिटकर, माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार बजरंग देसाई या प्रमुख नेत्यांचा हा घरचा मतदारसंघ असल्याने कोणाला संधी मिळणार व कोण बाजी मारणार, याची उत्कंठा लागून राहिली आहे.
या मतदारसंघात दहा गावे समाविष्ट असून, गारगोटी, मडिलगे बुद्रुक, मुदाळ, वाघापूर ही मोठी गावे आहेत. निवडणुकीत मतब्बर उतरणार असल्याने ही लढत लक्षवेधी ठरणार आहे. 2017 च्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसच्या रेश्मा राहुल देसाई विजयी झाल्या होत्या. यावेळी पुन्हा त्यांनाच राष्ट्रीय काँग्रेसकडून संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या गटातर्फे (शिवसेना) अनेकजण इच्छुक आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार के. पी. पाटील यांच्या सून मुदाळच्या सरपंच राजनंदिनी विकास पाटील लढण्याच्या तयारीत आहेत. मंत्री आबिटकर यांच्या गोटात सध्या जरी सामसूम स्थिती असली तरी हा मतदारसंघ त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचा आहे. यामुळे मंत्री आबिटकर जो निर्णय घेतील जो उमेदवार देतील त्याच्यासाठी कार्यकर्ते जीवाचे रान करणार आहेत. त्यांचा निर्णय अंतिम असेल. भुदरगड तालुक्यात सध्या तरी महायुती व महाविकास आघाडी अशी लढत होण्याची दाट शक्यता दिसते.
आघाडीचे चित्र राज्यातून होण्याची शक्यता आहे. आघाडीवरच विजयाची गणिते अवलंबून असल्याने भुदरगडवासीयांचे कोण कुणासोबत आघाडी करणार की राज्यातील आघाडी इथं कायम राहणार, याकडे लक्ष लागले आहे. राजकीय चित्र गारगोटी जिल्हा परिषद मतदारसंघ तालुक्यातील सर्वात मोठा व भुदरगड तालुक्यावर वर्चस्व ठेवणारा अतिसंवेदनशील मतदारसंघ आहे.
माजी आमदार के. पी. पाटील व राहुल देसाई एकत्रित युती करून आबिटकर गटाविरोधात लढत आहेत. माजी आमदार के. पी. पाटील यांनी महायुतीतील नेते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. माजी आमदार के. पी. पाटील व पालकमंत्री प्रकाश आबिटकर हे गुरु-शिष्य एकत्र आल्यास तालुक्याचे समीकरणच बदलणार आहे.
हे आहेत इच्छुक...
शिवसेना अर्थात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या गटाकडून अनेक पदाधिकारी इच्छुक असून, त्यांची नावे गुलदस्त्यात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार के. पी. पाटील यांच्या स्नुषा राजनंदिनी विकास पाटील, स्नेहा शेखर देसाई, रूपाली अजित देसाई, अलका पांडुरंग सोरटे, तर राष्ट्रीय काँग्रेसमधून विद्यमान सदस्य रेश्मा राहुल देसाई, भाजपकडून विद्या प्रवीणसिंह सावंत, नीलम राहुल चौगले, अमृता अलकेश कांदळकर, भारती अमोल पाटील आदी इच्छुक आहेत.
1️⃣ गारगोटी जिल्हा परिषद मतदारसंघाचे विशेष महत्त्व काय आहे?
गारगोटी हा पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचा होमपिच असून या मतदारसंघावर सर्वांचे लक्ष आहे.
2️⃣ राहुल देसाई कोण आहेत आणि त्यांनी कोणता निर्णय घेतला?
राहुल देसाई हे भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष असून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
3️⃣ या निर्णयाचा राजकीय परिणाम काय होईल?
या निर्णयामुळे भाजपला फटका बसू शकतो आणि काँग्रेसला गारगोटीत बळ मिळू शकते.
4️⃣ महायुतीचा यात काय सहभाग आहे?
महायुतीही निवडणुकीत उतरल्याने काँग्रेस, भाजप आणि महायुती यांच्यात त्रिकोणी लढत होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.