Chandrakant Patil: "तू तुझी पत सांभाळून रहा"; घायवळ प्रकरणात रोहित पवारांनी प्रश्न विचारताच चंद्रकांतदादांना संताप अनावर

Chandrakant Patil: गुंड निलेश घायवळ प्रकरणात पोलिसांना विचारणा करण्याऐवजी गौतमी पाटील अपघात प्रकरणात दखल घेणाऱ्या मंत्री चंद्रकांत पाटलांवर रोहित पवारांनी जोरदार टीका केली आहे.
Chandrakant Patil_Rohit Pawar
Chandrakant Patil_Rohit Pawar
Published on
Updated on

Pune News : गुंड निलेश घायवळ प्रकरणात पोलिसांना विचारणा करण्याऐवजी गौतमी पाटील अपघात प्रकरणात दखल घेणाऱ्या चंद्रकांत पाटलांवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार टीका केली आहे. यावर भाजपचे आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रोहित पवारांवर संताप व्यक्त केला आहे. "तू तुझी पत सांभाळून राहा" अशा शब्दांत ते रोहित पवारांवर भडकले.

Chandrakant Patil_Rohit Pawar
Gautami Patil: गौतमी पाटीलच्या अडचणी वाढल्या! अपघातग्रस्त रिक्षाचालकाच्या मुलीने रोहित पवारांच्या ट्विटमधील हवाच काढली

काय म्हणाले होते रोहित पवार?

रोहित पवार यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं की, चंद्रकांत पाटील यांच्या मतदारसंघातील नामचीन गुंड निलेश घायवळ पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून परदेशात पळून गेला, तरी चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांना फोन करून विचारणा करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसले नाही. मात्र, अपघातग्रस्त गाडीत गौतमी पाटील नसताना तिला उचलण्यासाठी पोलिसांवर दबाव आणणं हे आपल्यासारख्या नेत्याला शोभणारं नाही. पाटील यांनी अशा प्रकारे पोलिसांवर दबाव आणणे योग्य नाही"

Chandrakant Patil_Rohit Pawar
Ajit Pawar Politics : अजित पवारांच्या निर्णयावर नाराज, नाशिकचे तीनही खासदार थेट फडणवीसांकडे तक्रार करणार

चंद्रकांत पाटील संतापले

पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटलांना रोहित पवारांच्या या टिप्पणीबाबत विचारलं असताना ते चांगलेच संतापले. म्हणाले, "रोहित पवारला काय काम धंदा आहे का? तो लगेच नेता व्हायला चालला आहे. तू तुझी पत सांभाळून राहा. मला रोहित पवारने शिकवावं एवढी माझ्यावर वाईट वेळ आलेली नाही"

Chandrakant Patil_Rohit Pawar
Rahul Gandhi: राहुल गांधींचा 'मत चोरी'चा आरोप सिद्ध, पुरावेच सापडले; 'व्होट चोरांचे' मोबाईल भाजप कार्यकर्त्याचेच!

घायवळ प्रकरणात मी काय केलं हे सांगत फिरू का? त्याच्याविरोधात लूक आऊट नोटीस विनाकारण निघाली का? असं स्पष्टीकरणही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी आपल्यावरील आरोपांना दिलं. तसंच रोहित पवारांना प्रत्येक प्रकरणात ढोल वाजवण्याची सवय आहे, आम्हाला तशी नाही असा टोलाही त्यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com