Ghodganga Sugar Factory : घोडगंगा कारखाना शिरूरकरांसाठी देव, तो जगाला पाहिजे; शेतकरी संघटनेला चिंता

Ghodganga Meeting : एकहाती सत्ता, भौगोलिक स्थिती चांगली असूनही कारखाना डबघाईला कसा?
Balasaheb Ghadge
Balasaheb GhadgeSarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : 'अनेक वर्षांपासून एकहाती सत्ता, कुणाचाही हस्तक्षेप नाही, असे असतानाही अनपेक्षितपणे रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याना अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता किती दिवस कोजनचे कारण सांगणार, कारखाना सुरू होताना शेतकऱ्यांनी उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहिले होते, आता मात्र स्थिती वेगळीच झालेली आहे. कारखाना शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी देव आहे, तो जगला पाहिजे,' अशी अपेक्षा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख बाळासाहेब घाडगे यांनी व्यक्त केली. (Latest Political News)

घोडगंगा साखर कारखान्याची शुक्रवारी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे. दरम्यान, कारखान्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वर्षभराचे पगार रखडल्याने गेल्या तीन महिन्यांपासून कामगारांनी आंदोलन छेडले आहे. तोडणी आणि वाहतूकदारांसह शेतकरी सभासदांची देणी देण्यासाठी कारखान्याला मोठी कसरत करावी लागली. यामुळे यंदा हंगाम सुरू होण्याबाबत कामगारांसह शेतकऱ्यांनाही शंका आहे. या पार्श्वभूमीवर होत असलेल्या सभेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. याबाबत कारखाना उपाध्यक्ष पोपटराव भुजबळांनी सभेत सर्व विषयांवर चर्चा होणार असल्याचे सांगून जास्त बोलणे टाळले. (Maharashtra Political News)

Balasaheb Ghadge
Sunil Shelke Vs Dilip Mohite : पवनानंतर मावळात जाधववाडी धरणाचे पाणी पेटणार!आमदार सुनील शेळके-दिलीप मोहिते भिडणार

दरम्यान, कारखान्याच्या अवस्थेला प्रशासनास जबाबदार धरून शेतकरी नेते घाडगेंनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, 'कारखाना सुरू होणार का हाच मोठा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. तसेच एफआरपीशिवाय किती रक्कम वाढवून मिळणार याकडे लक्ष आहे. सध्या तालुक्यात दहा लाख टनांहून अधिक ऊस आहे. शिरूर तालु्क्यातील भौगोलिक परिस्थिती चांगली आहे. वाहतुकीसाठी कसलीही अडचण नाही. तसेच एकहाती कारभार असतानाही इतर कारखान्यांच्या तुलनेत कमी दर का दिला जातो, हे सुटलेले कोडे आहे.'

घोडगंगा साखर कारखान्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. भौगोलिक स्थिती चांगली असल्याने हा कारखाना राज्यात पहिल्या पाच क्रमांकात यायला हवा होता. कारखाना सुरू झाला, त्यावेळी तालुक्यातील शेतकऱ्यांचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे वाटत होते. मात्र, अनपेक्षितपणे कारखान्याला वाईट दिवस आले. ही काही नैसर्गिक आपत्ती नाही. अनेक वर्षे एकहाती सत्ता देऊनही प्रशानाकडून अडचणींचा पाढा कमी होण्याचे नाव घेत नाही. याला फक्त कारखान्याचे व्यवस्थापन जबाबदार आहे, असा घणाघातही घाडगे यांनी केला.

शेतकऱ्यांना काय निसर्गाची साथ असते. मात्र, सुलतानी संकटांनी शेतकरी मेटाकुटीला आलेले आहेत. घोडगंगा साखर कारखान्याला चांगले दिवस दाखवण्यात सभासद शेतकरी, प्रशासनासह कामगारांचेही मोठे योगदान आहे. कामगारांच्या मागण्या रास्त असून, आंदोलनाला तिसऱ्याच दिवशी शेतकरी संघटने पाठिंबा दिला आहे. आम्हाला पैसे कमी मिळू द्या, पण तालुक्यातील एकमेव असलेली सहकारी संस्था टिकली पाहिजे. कारखाना आमच्यासाठी देव आहे. तो जगला पाहिजे, असे भावनिक आवाहनही घाडगेंनी केले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Balasaheb Ghadge
MLA Santosh Bangar Wish : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, विघ्नहर्त्या बाप्पाकडून बांगरांनी घेतला नवसाचा मोदक...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com