Gopichand Padalkar In Baramati: अजित पवारांच्या शपथविधीनंतर गोपीचंद पडळकर बारामतीत; म्हणाले ‘अजितदादा भाजपसोबत येण्याचा आनंदच...’

एरवी पवारांवर तुटून पडणारे पडळकर रविवारी मावळ दिसत होते
Gopichand Padalkar
Gopichand PadalkarSarkarnama
Published on
Updated on

Baramati News : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे रविवारी सायंकाळी बारामतीत होते. एरवी पवारांवर तुटून पडणारे पडळकर रविवारी मावळ झाले होते. अजितदादा पवार भाजपबरोबर येऊन उपमुख्यमंत्री झाले, त्याचा आम्हाला आनंदच आहे, अशा शब्दांत त्यांनी अजित पवारांच्या उपमुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केले. (Gopichand Padalkar in Baramati after Ajit Pawar's swearing in)

बारामती (Baramati) तालुक्यातील शारदानगर येथे रविवारी भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात आमदार पडळकर (Gopichand Padalkar) बोलत होते. ते म्हणाले की, अजितदादा (Ajit Pawar) जरी भाजपसोबत आले असले तरी भाजपच्या बारामतीतील नेतेमंडळींनी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाचे काम थांबवू नये. बारामती विधानसभा प्रमुखांसह कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नऊ वर्षांतील काम घरोघरापर्यंत पोचवा. तुमच्या कामाची दखल भाजपचे नेतेमंडळी घेतल्याशिवाय राहणार नाहीत.

Gopichand Padalkar
Sharad Pawar On Praful Patel: प्रफुल्लभाई भाग्यवान, नुसता फॉर्म भरला की संसदेचे सदस्य होतात; शरद पवारांचा पटेलांना चिमटा

शारदानगर येथील मेळाव्याला भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब गावडे, बारामती विधान सभा मतदार संघ निवडणूक प्रमुख रंजन तावरे, तालुकाध्यक्ष पांडूरंग कचरे, शहराध्यक्ष सतिश फाळके, राजेंद्र कांबळे, सुनील माने, मच्छिंद्र टिंगरे, सुधीर पांढरे, संतोष देवकाते आदी उपस्थित होते. ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि सरकारमध्ये वातावरण बदलेले आहे. पण, भाजप कार्यकर्त्यांनी कसलीही हतबलता दाखवू नये, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

Gopichand Padalkar
Bihar Politic's : महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्येही राजकीय भूकंप होणार?; नीतीशकुमारांचे आमदार एनडीएच्या गळा लागल्याचा दावा

महाराष्ट्रातील जनतेच्या हिताच्या दृष्टीने ‘नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे आदी भाजपच्या वरिष्ठ नेतेमंडळींनी योग्य तो निर्णय घेतला असावा. त्यातूनच राष्ट्रवादीमधील बहुतांशी आमदार आणि अजितदादा शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले असावेत, असेही पडळकर यांनी नमूद केले.

Gopichand Padalkar
Baramati Dudh Sangh: मोठ्या राजकीय उलथापालथीमध्येही अजित पवारांचे बारामतीवर लक्ष; दूध संघाच्या अध्यक्षपदी गावडेंची केली निवड

या सभेत पडळकर यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या लोकाभिमुख योजनांची माहिती उपस्थितांना सांगितली. बारामती विधानसभा निवडणूक प्रमुख रंजन तावरे यांनीही अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्याचे स्वागत केले आणि कार्यकर्त्यांना नाउमेद होऊ नका, असा सल्ला दिला. सतीश फाळके, राजेंद्र कांबळे यांनी स्थानिक लोकांच्या सर्वजनिक प्रश्नांकडे नेतेमंडळींचे लक्ष वेधले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com