Governor Ramesh Bais On Porsche Car Accident : राज्यपाल बैस म्हणतात;...तर 'कल्याणीनगर'सारखी दुर्घटना घडलीच नसती!

Governor Ramesh Bais Statement On Porsche Car Accident : राष्ट्रीय छात्रसेनेत विद्यार्थ्यांवर देशभक्ती,शिस्त व समाजसेवेचे संस्कार घडतात. सर्वांसाठी एनसीसी प्रशिक्षण अनिवार्य झाले तर ती एक चांगली गोष्ट असणार आहे.
Governor Ramesh Bais
Governor Ramesh Bais Sarkarnama

Pune Porsche Car Accident : पुण्यातील कल्याणीनगर येथे पोर्शे कारच्या अल्पवयीन कारचालकाने मद्यधुंद अवस्थेत तरुण-तरुणीला उडवले. या अपघात प्रकरणी सर्वच यंत्रणा कामाला लागली असून रोज नवनवे धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत.

स्वत: मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांनी या प्रकरणात लक्ष घातलेले असून पोलिस (Police),डॉक्टर यांचे निलंबन करण्यात आले आहे. एकीकडे या घटनेवरुन विरोधकांनी सरकारच्या नाकीनऊ आणलेले असतानाच आता राज्यपाल रमेश बैस यांनी कल्याणीनगर अपघातप्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) हे गुरुवारी (ता.30) राष्ट्रीय छात्र सेनेच्या राजभवन येथे झालेल्या कार्यक्रमात बोलत होते.कल्याणीनगर अपघात प्रकरणावर भाष्य करताना त्यांनी पुणे येथील अल्पवयीन युवकाला एनसीसी प्रशिक्षण मिळाले असते तर त्याच्याकडून अशी दुर्घटना घडली नसती असं विधान केलं आहे.

ते म्हणाले,राष्ट्रीय छात्रसेनेत विद्यार्थ्यांवर देशभक्ती,शिस्त व समाजसेवेचे संस्कार घडतात. सर्वांसाठी एनसीसी प्रशिक्षण अनिवार्य झाले तर ती एक चांगली गोष्ट असणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Governor Ramesh Bais
Sangola politics : सांगोल्यात कमळाचा बोलबोला; पण शहाजीबापू अन्‌ डॉ. देशमुखांची लिट्‌मस टेस्ट

यावेळी राज्यपाल रमेश बैस यांनी महाराष्ट्रातील एनसीसीच्या कार्यपध्दतीचाही आढावा घेतला.ते म्हणाले, राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एनसीसी कार्यरत असून एकूण 1 लाख 17 कॅडेट्स कार्यरत आहेत. आगामी दहा वर्षांत कॅडेट्सची राज्यातील संख्या 1 लाख 85 एवढी वाढवण्यात येणार ही बाब नक्कीच कौतुकास्पद आहे असेही बैस यांनी यावेळी नमूद केले.

आपण देखील एनसीसी कॅडेट होतो अशी आठवण सांगतानाच बैस यांनी एनसीसी प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी निवडलेल्या क्षेत्रात काम करताना राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा सल्लाही दिला. देशातील शाळा तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिस्तीचे महत्व रुजवले तर देश अतिशय वेगाने प्रगती करणार असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

Governor Ramesh Bais
Rahul Gandhi : प्रचार संपताच राहुल गांधींचं ट्विट, सांगितला लोकसभेचा निकाल; मोदींनाही काढला चिमटा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com