Ajit Pawar News : तेव्हा तत्व कुठे गेली? अजितदादा कडाडले

Ajit Pawar In Bhide Wada : पालकमंत्री अजित पवारांनी केली राष्ट्रीय स्मारक भिडे वाड्याची पाहणी
Ajit Pawar News :
Ajit Pawar News :Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून बाहेर पडलेल्या अजितदादांच्या मनात आजही पक्षातून बाहेर पडल्याची सल कायम असल्याचे दिसते. सहा महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीमधील वरिष्ठ सहकाऱ्यांना एकत्र करून अजितदादांनी पक्षात बंड पुकारले. राज्यात सत्ताधारी असलेल्या एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारला पाठिंबा देत दादा सत्तेत सहभागी झाले. त्यांच्यासह त्यांच्याबरोबर सत्तेत सहभागी झालेल्या सहकाऱ्यांना मंत्रिपदे देण्यात आली.

अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आले. पक्षात बंड करून बाहेर पडल्यानंतर अजित पवार यांना पक्ष सोडून जाणाबाबत प्रश्न विचारताच प्रत्येकवेळी त्यांचा पार चढल्याचेच चित्र पाहायला मिळते. शनिवारी महात्मा फुले वाडा, राष्ट्रीय स्मारक भिडे वाडा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाची पाहणी पालकमंत्री अजित पवार यांनी केली. यावेळी अजितदादा यांचा पारा चढल्याचे पाहायला मिळाला. माध्यमांशी संवाद साधताना 'सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कोण कुठल्या पक्षात जाईल, हे सांगता येत नाही', असे वक्तव्य भाजपचे नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे, याबाबत तुमचे काय म्हणणे आहे, असा प्रश्न अजितदादांना विचारण्यात आला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ajit Pawar News :
Manoj Jarang News : हेलिकॉप्टर, 201 जेसीबींमधून जरांगेंवर पुष्पवृष्टी होणार!

अजितदादा म्हणाले, तो त्यांचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला कोठेही जाण्याचा अधिकार आहे. जसे तुमच्या क्षेत्रात आज तुम्ही एका चॅनेलमध्ये दुसऱ्या दिवशी इतर चॅनेलला असता. आम्ही काही बोलतो का, का रे तू इकडे का गेला, तिकडे का गेला म्हणून, तो जसा तुमचा अधिकार आहे, तसेच कोणी कोणत्या पक्षात जावे, याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहेच ना. त्यावर मग तत्व गुंडाळायची का?, असा प्रतिप्रश्न अजितदादा यांना केला असता.

चिडलेल्या दादांनी तत्व कशाची गुंडाळली. उगाच प्रश्न विचारून 'ध' चा 'मा' करू नका, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनचा इतिहास पाहिला तर वेगवेगळ्या घटना घडलेल्या आहेत. इंदिराजींनी आणीबाणी आणल्यानंतर वेगवेगळ्या विचारांची लोक एकत्र आल्याचे तुम्ही बघितले आहे. त्यातूनच जनता पक्ष स्थापन झाला. तेव्हा तत्व कुठे गेली होती? असे म्हणत त्या त्यावेळची राजकीय परिस्थिती बघून निर्णय घेतले जातात, अशी अनेक उदाहरणे असल्याचे सांगितले.

मुंबईत गुरुवारी अजित पवार गटाची बैठक झाली. त्यामध्ये जागा वाटपाबाबत काय निर्णय झाला, असा प्रश्न अजितदादांना विचारला असता, अजित पवार गटाची बैठक नव्हे राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. तुम्ही कोण म्हणणार अजित पवार गट? मी म्हणतोय ना राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून मग तेच म्हणा, असेही अजित पवार यांनी यावेळी सुनावले.

(Edited By - Chaitanya Machale)

Ajit Pawar News :
Bhandara : मंत्री अदिती तटकरे आल्या, रिकाम्या खुर्च्यांमुळे आमदारावर नाराज झाल्या

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com